शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास घाडगेंकडून तपास काढा

By admin | Updated: September 14, 2016 00:11 IST

नागपूर येथील रुग्णालयात जाऊन आश्रम ट्रस्टीचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी व त्यांची पत्नी चोरपावलांनी प्रथमेशच्या भेटीला जातात,...

शिरीष चौधरीच्या अटकेसाठी निदर्शने : लहुजी सेनेसह मानवी हक्क अभियानची मागणीअमरावती : नागपूर येथील रुग्णालयात जाऊन आश्रम ट्रस्टीचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी व त्यांची पत्नी चोरपावलांनी प्रथमेशच्या भेटीला जातात, त्यांना तेथील पोलीस चौकशी न करता आज प्रवेश देतात. ही बाब पोलीस व विश्वस्तांमध्ये साटेलोटे असण्याचा संशय निर्माण करणारी आहे. त्या अनुषंगाने सखोल चौकशी करून शिरीष चौधरीला अटक करावी, त्याचप्रमाणे या प्रकरणाचा तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास घाडगे यांचे तपासकार्य असमाधानी असल्याने त्यांच्याकडून तपासकार्य काढावे, अशा मागण्या घेऊन लहुची सेनेसह मानवी हक्क अभियान संघटनेचे पदाधिकारी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले. यासंदर्भात निवेदन देण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर तीव्र नारेबाजी केली. नागपंचमीला प्रथमेश सगणेचा नरबळी घेण्याचा प्रयत्न झाला. त्याला नागपूर रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, तेथेही त्याच्या जीवाला धोका निर्माण होणारे प्रकार समोर येत आहे. शंकर महाराज यांच्या आश्रम संस्थाचे अध्यक्ष शिरीष चौधरी, त्यांची पत्नी व अन्य सहकारी हे प्रथमेशला भेटण्याकरिता चोरून आयसीयूत गेले. प्रथमेशचे फोटो काढले, त्यांचे चोरून आत जाण्याचे कारण काय, त्याचा आत जाण्याचा उद्देश काय होता, असा सवाल लहूजी सेनेने उपस्थित केला आहे. प्रथमेशला भेटण्यासाठी पत्रकारांना व अन्य कोणालाही पोलिसांकडून मज्जाव केला जातो. मग तिथे ट्रस्टीना कसे काय जाऊ दिल्या जाते, या प्रकारामुळे प्रथमेशचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. प्रथमेशच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी याबाबत बघ्यांची भूमिका का घेतात. याप्रकारामुळे पोलीस व विश्वस्तांमध्ये साटेलोटे असल्याची दाट शक्यता असल्याचा आरोप लहुजी सेनेने निवेदनातून केला आहे. प्रथमेशच्या सुरक्षेमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तसेच तेथे तैनात पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, त्याचप्रमाणे शिरीष चौधरी याला अटक करून सखोल चौकशी करून प्रथमेशला न्याय द्यावा, अशी मागणी लहुजी सेनेने केली आहे. प्रथमेश प्रकरणात तपास अधिकारी तपासकार्याबद्दल काही बोलायला तयार नाहीत, त्यांचे तपास कार्य असमाधानी असल्याची ओरड प्रथमेशच्या हितचिंतकांची आहे. त्यामुळे घाडगेंकडून तपासकार्य काढण्यात यावा, अशीही मागणी आता जोर धरू लागली आहे. निवेदनदेतेवेळी विदर्भ अध्यक्ष रुपेश खडसे, गणेशदास गायकवाड, उत्तमराव भैसने, गणेश कलाने, अभोंरे, युवराज गजभिये, संतोष दांडगे, कैलास स्वर्गे, निरंजन सगणे, बबलू तायडे, पकंज जाधव यांच्यासह मानवी हक्क अभियान संघटनेचे महानगर अध्यक्ष प्रभाकर वाळसे व शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते.