शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

घरी नेलेले पार्थिव पुन्हा आणले इर्विनमध्ये

By admin | Updated: September 23, 2015 00:15 IST

विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मरण पावलेल्या युवतीचा मृतदेह इर्विन रुग्णालयातून घरी नेण्यात आला.

शॉक लागून युवतीचा मृत्यू : पोलिसांनी करून घेतले शवविच्छेदनअमरावती : विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मरण पावलेल्या युवतीचा मृतदेह इर्विन रुग्णालयातून घरी नेण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पुन्हा इर्विनला आणला. ही घटना गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत रामपुरी कॅम्प परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. कोमल दिलीप फुलवानी (१७) असे मृत युवतीचे नाव आहे. रामपुरी कॅम्प परिसरातील रहिवासी कोमलला घरात विद्युत प्रवाहाचा झटका बसला. कुटुंबीयांनी तिला तत्काळ उपचाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी कोमलला मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह परत घरी नेला. याची दखल जिल्हा सामान्य रूग्णालयातही घेण्यात आली नाही. कोमलच्या मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली होती. त्यामुळे या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. गाडगेनगर पोलिसांना देखील घटनेची कुणकुण लागली. विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मरण पावलेल्या व्यक्तिचे शवविच्छेदन करणे आवश्यक असल्याने पोलिसांनी तत्काळ मृत कोमल हिचे घर गाठले. नातेवाईकांची समजूत घालून रात्रीला मृतदेह पुन्हा शवविच्छेदनाकरिता इर्विनमध्ये आणला. मंगळवारी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी सजगता दाखवून स्थिती हाताळली व तरूणीच्या पार्थिवाचे शवविच्छेदन पार पडले. (प्रतिनिधी)नातेवाईकांनी इर्विनमधून मृतदेह परस्पर घरी नेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृताच्या घरी जाऊन नातेवाईकांची समजूत घातली. त्यानंतर मृतदेह इर्विनमध्ये पुन्हा शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.- के.एम.पुंडकर, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे.