शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

श्वानभक्षकांची माहिती द्या, सीपींचे नागरिकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:19 IST

श्वानचौर्य, श्वानहत्या व श्वानभक्षण प्रकरणाची पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी गंभीर दखल घेऊन श्वानभक्षकांची माहिती देण्याचे आवाहन अमरावतीकरांना केले आहे.

ठळक मुद्देराजापेठ पीआयची कसोटी : कुठलेही दडपण बाळगू नका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्वानचौर्य, श्वानहत्या व श्वानभक्षण प्रकरणाची पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी गंभीर दखल घेऊन श्वानभक्षकांची माहिती देण्याचे आवाहन अमरावतीकरांना केले आहे.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रातीयांच्या वसतिगृहात घडलेल्या श्वानभक्षण प्रकरणातील आरोपींना पोलीस कधी अटक करतात, याची प्रतीक्षा अमरावतीकर करीत आहेत. 'लोकमत'ने वृत्त मालिकेतून या प्रकरणातील अनेक तत्थ लोकदरबारात उघड केले. या प्रकरणाचा तपास राजापेठ पोलिसांकडे आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर करणाºया राजापेठ पोलिसांनी आता तपासातही पिछाडी कायम राखली आहे. प्रकरण गंभीर असताना आणि श्रीनाथवाडी परिसरातील लोकभावना या प्रकरणाशी जुळलेल्या असताना देखील राजापेठ पोलिसांना तपासात यश मिळविता आले नाही. तपास जाणिवपूर्वकरीत्या संथ ठेवण्यात आला असल्याचा आरोप श्रीनाथवाडी परिसरातील नागरिकांचा आहे.पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ते थेट राजापेठ पोलिसांकडून यासंबंधाने नियमित मागवित आहेत. श्वान चोरले कुणी, कापले कुठे आणि शिजविले कुठे? याबाबतची माहिती तपासातून निष्पन्न करण्याच्या सूचना राजापेठ ठाण्याच्या अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. आवश्यक ते पुरावे गोळा करण्याचेही निर्देशित करण्यात आले आहे. तथापि, राजापेठ पोलिसांनी निर्णायक गती न घेतल्याने तपास सुखर व्हावा, यासाठी पोलीस आयुक्त मंडलिक यांनी नागरिकांनाच पुढे येण्याचे आवाहन केले आहे.नागरिकांना एचव्हीपीएम प्रकरणातील श्वान चौर्य, श्वान हत्या किंवा श्वानभक्षण यापैकी कुठल्याही घटनेबाबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष माहिती असल्यास त्यांनी राजापेठ पोलिसांना वा थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाºयाने कुठलेही दडपण वा भीती बाळगू नये, पोलीस त्यांना सर्वत: मदत करेल, असेही पोलीस आयुक्तांनी आश्वस्त केले आहे.श्वानभक्षणाच्या या गंभीर कृत्याबाबत आता काही संघटना पुढे सरसावल्या आहेत. शनिवारी भाजपा ओबीसी मोर्चा विद्यापीठ मंडळाच्या पदाधिकाºयांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदनही सादर केले आहे. परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या श्वानभक्षण प्रकरणात आरोपींना अटक करण्याची मागणी विद्यापीठ मंडळाच्या पदाधिकाºयांनी केली आहे.