शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

‘रेन वाॅटर हार्वेस्टिंग’मध्ये लोकसहभाग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST

अमरावती : शहराची भूजलपातळी वाढण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करून यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन ...

अमरावती : शहराची भूजलपातळी वाढण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करून यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले.

भूजलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने शहरातील पाण्‍याची पातळी वा‍ढविण्‍यासाठी या शहरातील सर्वांनी सामूहिक प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. पाऊस शहरात मोठ्या प्रमाणात पडतो, पण त्‍याची साठवणूक होणे गरजेचे आहे. त्‍यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करणे अत्‍यंत आवश्‍यक असल्याचे गावंडे म्हणाले.

सांडपाणी, वाया गेलेले पाणी, वापरून उरलेले, गढूळ पाणी शोषखड्ड्यात मुरविले जाते. शोषखड्ड्याद्वारे पाणी आसपासच्‍या जमिनीत मुरते. छतावरील पावसाचे पाणी अशुद्ध होण्‍याअगोदर पाईपद्वारे गोळा करून फिल्‍टर टँकमधून गाळून निघालेले पाणी बोअरवेल किंवा विहिरीमध्‍ये सोडणे म्‍हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग होय, असे महापौर म्हणाले.

बॉक्स

- तर विजेच्या वापरातही होणार बचत

जलसंधारण आणि नियोजन केल्‍यास, पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर विसंबून राहावे लागणार नाही. जलसंधारणामुळे भूजलची पातळी वाढते व पाणी वर खेचण्‍यासाठी लागणाऱ्या विजेच्‍या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्‍याच्‍या प्रदूषणाचे सौम्‍यीकरण झाल्‍यामुळे पाण्‍याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्‍यास काही प्रमाणात मदत होत असल्याचे महापौर म्हणाले.