शेतकऱ्यांनी सजग राहण्याची गरज : आठवड्यावर आला खरीप हंगाम
गजानन मोहोड - अमरावती
खरीप हंगाम आठवड्यावर आला आहे. यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतीसंबंधी सर्व घटकामध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या ३० हजार हेक्टर पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. बाजारातील उपलब्धतेनुसार
शेतकरी वाणाची निवड करतात. मात्र यामध्ये फसगतीची शक्यता असते. यावर्षी १.८८ लाख क्विंटल संकरीत बियाण्यांची आवश्यकता आहे. बियाणे उपलब्ध आहेत. मात्र, यापूर्वीच बी.टी. या कपाशीच्या वाणाचे बोगस बियाणे बाजारात आले आहेत.
खरीप हंगामात कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचे पेरणीक्षेत्र कित्येक पटींनी वाढले. मात्र, पेरणीपासून सततचा पाऊस व सोंगणीच्या काळात झालेला पाऊस यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या तुलनेत कपाशीचे सरासरी उत्पन्न झाले. त्यामुळेच यंदा
कपाशीच्या पेरणीक्षेत्रात वाढ होणार, हे हेरुन बियाणे बाजारात आरआर, राऊंडअप, विडगार्ड, बेगम यांसह अन्य नावाने बोगस कंपन्यांचा शिरकाव झाला आहे.
बनावट बियाण्यांमुळे कपाशी पिकाला भीती
हे बियाणे अधिकृत नाही. या बियाण्यांच्या विक्रीसाठी शासनाची परवानगी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊन कपाशीचे पीकदेखील धोक्यात येण्याची शक्यता आहे.
नागपूर व यवतमाळ येथील खासगी गोदामात कृषी विभागाने धाडी घालून १० लाखांवर किमतीची बियाणे जप्त करण्यात आली. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात बोगस बी. टी. बियाण्यांची शक्यता स्पष्ट झाले आहे. अमरावती विभागात केवळ धाड वगळता अन्य
कुठेही व जिल्ह्यात कृषी विभागाची कारवाई खरीप हंगामपूर्व झालेली नाही. सुस्तावलेल्या कृषी विभागाला वेळीच जाग येऊन बियाण्यांचा काळाबाजार व बोगस बियाण्यांची विक्रीस पायबंद न घातल्यास शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोर्शी, वरुड, धामणगाव तालुक्यातदेखील विक्री
यवतमाळ येथील बोगस बी. टी. बियाण्यांचे धागेदोरे अमरावती जिल्ह्यातदेखील जुळलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कपाशीचे सर्वाधिक पेरणी क्षेत्र असणाऱ्या मोर्शी, वरूड, अचलपूर, चांदूरबाजार व धामणगाव रेल्वे तालुक्यातदेखील बोगस बी. टी.
बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती आहे. मात्र कृषी विभागाद्वारे कुठलीही कारवाई नाही.
अमरावती जिल्ह्यात कपाशीचे संभाव्य सर्वाधिक क्षेत्र वरूड तालुका २५ हजार ५०० हेक्टर, दर्यापूर तालुका २२ हजार ५०० हेक्टर, अचलपूर तालुका १७ हजार २०० हेक्टर, धामणगाव रेल्वे १५ हजार ९०० हेक्टर, मोर्शी तालुका १५ हजार ६०० हेक्टर,
चांदूरबाजार तालुका १५ हजार २५० हेक्टर, तिवसा तालुका ९ हजार ९५० हेक्टर यासह जिल्ह्यात १ लाख ५९ हजार क्षेत्रात यावर्षी खरीप हंगामाची पेरणी होणार आहे.
बोगस बीटीचा शिरकाव
By admin | Updated: June 12, 2014 23:37 IST
खरीप हंगाम आठवड्यावर आला आहे. यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतीसंबंधी सर्व घटकामध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या ३० हजार हेक्टर पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे.
बोगस बीटीचा शिरकाव
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}