शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गौरी इनजवळील घटना : टँकरचालक पसार

By admin | Updated: January 8, 2016 00:25 IST

अज्ञात टँकरच्या धडकेत दुचाकीवर जात असलेले सुरक्षा रक्षक ठार झाले असून त्यांच्यासोबतच्या महिला गंभीर जखमी झाल्या.

अमरावती : अज्ञात टँकरच्या धडकेत दुचाकीवर जात असलेले सुरक्षा रक्षक ठार झाले असून त्यांच्यासोबतच्या महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मोर्शी मार्गावरील गौरी इन हॉटेलसमोर घडली. नारायण महादेव तायडे (४०,रा. केवल कॉलनी) असे मृताचे तर संगीता दादाराव वानखडे (३५,रा. छत्रसालनगर) असे जखमीचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, मृत नारायण तायडे हे शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत आहेत. ते गुरुवारी सकाळी संगीता वानखडे या महिलेसोबत दुचाकी क्रमांक एमएच २७- एएस- ७२४७ ने रहाटगावाहून अमरावतीकडे येत होते. दरम्यान मोर्शी मार्गावरील गौरी इन हॉटेलसमोर विरुध्द दिशेने येणाऱ्या अज्ञात टँकरने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात नारायण तायडे हे टँकरच्या चाकात आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. संगीता वानखडे या रक्तबंबाळ अवस्थेत मार्गावर कोसळल्या होत्या. अपघातानंतर टँकर घटनास्थळावरून पसार झाला. त्या मार्गाने जाणारे धूळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सचिन एकनाथ कोरडे यांच्या दृष्टीस पडताच त्यांनी तत्काळ जखमीची तपासणी केली. त्यावेळी नारायण हे मृतावस्थेत आढळून आले, तर गंभीर जखमी महिलेला त्यांनी जवळील वाहनात टाकून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्यामुळे संगीता हिच्यावर तत्काळ औषधोपचार सुरू करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुंड यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. नारायण तायडे यांचा मृतदेह इर्विनच्या शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक के.एम. पुंडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी करीत आहेत. (प्रतिनिधी)