शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांचा कारभार रामभरोसे

By admin | Updated: June 25, 2014 23:32 IST

गोरगरीब निराधार नागरिकांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. परंतु बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या लापरवाहीने

अचलपूर : गोरगरीब निराधार नागरिकांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. परंतु बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या लापरवाहीने या योजनांना हरताळ फासला जात आहे. परिणामी अनेक निराधार लाभार्थ्यांना योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.संजयगांधी, इंदिरा गांधी तथा श्रावणबाळ निराधार योजनांचा लाभ घेण्यासाठी निराधारांना कार्यालय व बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. या शासकीय योजनेच्या कार्यालयांमधील गोंधळ असल्याची माहिती हाती आली आहे. हा विभाग रामभरोसे सुरु असून यावर अधिकाऱ्यांचा अंकुश आहे काय, असा प्रश्न जनतेत उपस्थित झाला आहे. दारिद्र्यरेषेखाली येत असलेल्या अनेक निराधार नागरिक संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित आहेत. त्यातील काहींना गेल्या तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. काही केशरी शिधा पत्रिकाधारकांना दारिद्र्यरेषेखाली दाखवून निराधार योजनेत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. वास्तविक निराधार, वयोवृद्धांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी सरकार लाखो रुपये खर्च करीत असताना त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कधी तहसील तर कधी बँकेत खाते उघडण्यासाठी चकरा माराव्या लागत आहे. त्यासाठी त्यांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे.आॅनलाईन डाटा सुरु झाल्यापासून गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांना अनुदान मिळाले नाही. अनेक निराधारांचा दारिद्र्यरेषेखालील कार्डमध्ये समावेश केल्याने अनुदान मिळण्यास अडथळे येत असल्याची माहिती आहे. काही निराधारांना तर गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान मिळाले नाहीत.शासकीय योजनांच्या लाभापासून अजूनही कित्येक लाभार्थी वंचित असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी दलालांचा बोलबाला आहे. लाभाच्या प्राप्तीसाठी दलाल लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. त्यांच्या माध्यमातून गेल्यास तत्काळ काम होते. तर सामान्य नागरिक गेल्यास त्यांना भटकंती करावी लागते, असे चित्र येथील तहसील कार्यालयात बघायला मिळत आहे.संजय गांधी निराधार योजनेच्या शहरी विभागाचे प्रमुख तथा नायब तहसीलदार व्ही.एम. कांडलकर यांचेशी संपर्क होऊ न शकल्याने ग्रामीण भागाचे प्रमुख नायब तहसीलदार फुलमाळी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, ''सध्या आॅन लाइन डाटा एन्ट्री सुरु आहे. अजून एक ते दीड महिना हे काम चालणार आहे. त्यानंतर डाटा मुंबई येथे जाऊन व मुंबईहून डाटा परत आल्यावर माहिती मिळेल. आम्ही आमच्या स्तरावर काहीच करु शकत नाही''. (शहर प्रतिनिधी)