अवैध दारू विक्रेत्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:01 IST2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:01:13+5:30

चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोदोरी गावातील नदीपात्रात सडवा मोहाची दारू तयार होत असल्याच्या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबादगिरे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार उदयसिंग साळुंखे यांच्या नेतृत्वात धाड टाकून ४० हजारांचा सडवा मोहा जप्त करण्यात आला. जप्त माल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस नाईक वीरेंद्र अमृतकर व निकेश नशीबकर यांनी केली.

 Illegal liquor dealers arrested | अवैध दारू विक्रेत्यांना अटक

अवैध दारू विक्रेत्यांना अटक

ठळक मुद्दे९० हजारांचा मुद्देमाल जप्त : चांदूरबाजार पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : स्थानिक पोलिसांनी तालुक्यातील कोदोरी येथील नदीपात्रात ७ पिपे सडवा मोहा जप्त केला, तर दुसऱ्या कारवाईत काजळी येथून हातभट्टीची दारू जप्त केली.
चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोदोरी गावातील नदीपात्रात सडवा मोहाची दारू तयार होत असल्याच्या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबादगिरे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार उदयसिंग साळुंखे यांच्या नेतृत्वात धाड टाकून ४० हजारांचा सडवा मोहा जप्त करण्यात आला. जप्त माल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस नाईक वीरेंद्र अमृतकर व निकेश नशीबकर यांनी केली.
काजळी येथे नाकाबंदी दरम्यानच्या कारवाईत अज्ञात आरोपीने दुचाकी व ट्यूबमध्ये भरलेली १०० लिटर गावठी दारू सोडून घटनास्थळाहून पळ काढला. पोलिसांनी एमएच २७ सीजे १७२१ या क्रमांकाची दुचाकी व १०० लिटर गावठी दारू असा ५० हजार रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई पथकाने केली.

Web Title:  Illegal liquor dealers arrested