शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यावर पे्रम केले नाही, तर चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकेन

By admin | Updated: April 30, 2015 00:24 IST

एकतर्फी प्रेमातून तरुणीला अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला फे्रजरपुरा पोलिसांनी मंगळवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास परतवाडा येथून अटक केली. ...

परतवाड्याच्या तरुणाला अटक तरुणीच्या वाहनात धमकीच्या चिठ्ठ्याअमरावती : एकतर्फी प्रेमातून तरुणीला अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला फे्रजरपुरा पोलिसांनी मंगळवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास परतवाडा येथून अटक केली. प्रितम उत्तमगीर गिरी (१९, रा.संतोष भुवन, गाडगेनगर) असे, अटकेतील आरोपीचे नाव आहे. परतवाडा येथील रहिवासी प्रितम गिरी शिक्षणासाठी अमरावतीत आला होता. त्याने गाडगेनगर परिसरात भाड्याने घर घेऊन तंत्रनिकेतन पदविका पूर्ण केली. २०१० मध्ये गाडगेनगर परिसरात त्याला २१ वर्षीय तरुणी घरासमोरुन जाताना दिसली. त्या तरुणीची इत्थंभूत माहितीसह मोबाईल क्रमांकही त्याने मिळविला. तिला प्रेमजाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. बरेच दिवस ओलांडून गेल्यावरही तरुणी दाद देत नसल्याने त्याने २०१२ मध्ये व्हॅलेन्टाईनच्या दिवशी कॉल करुन प्रेमाची भावना व्यक्त केली. मात्र, तरुणीने नकार दिल्याने प्रितमची निराशा झाली. तरीसुध्दा प्रितमने त्या तरुणीचा पाठलाग सुरु ठेवला. दरम्यान, एका ठिकाणी ती युवती तिच्या मित्रासोबत बोलताना प्रितमला दिसल्याने त्याचा राग अनावर झाला. त्यामुळे दुसऱ्या मार्गाने प्रेम मिळविण्याचा प्रयत्न प्रितमने सुरु केला. प्रितमने त्या तरुणीचे फेसबुक अकॉऊंट तयार करुन त्यावर फोटो अपलोड करणे सुरु केले. त्यासाठी पीडित तरुणीच्या ओळखीतील मित्र-मैत्रिणींशी आॅनलाईन चॅटिंग करुन माहिती प्राप्त ेकेली. त्यानंतर प्रितमने तिच्या महाविद्यालयात जाऊन तिच्या दुचाकीच्या डिक्कीत धमक्यांच्या चिठ्ठ्यादेखील टाकणे सुरु केले . माझ्यावर प्रेम जर केले नाही, तर मी तुझ्या चेहरा अ‍ॅसिड फेकून विद्रुप करेल, असे चिठ्ठीत लिहिले होते. तशाच चिठ्ठ्या प्रितमने पीडित मुलीच्या आई-वडिलांनासुध्दा पाठविल्या होत्या. त्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला. या प्रकाराबाबत तरुणीने १८ एप्रिल रोजी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३५४(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचे गांभीर्य बघता पोलीस निरीक्षक डी.सी. खंडेराव, एपीआय रोशन सिरसाट पोलीस शिपाई रवींद्र राठोड, गजानन बरडे, रोशन किरसान व विजय राऊत यांनी तत्काळ तपासकार्य सुरु केले. चिठ्ठीवरील हस्ताक्षर व मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी रात्री प्रितमला अटक केली. सिमसाठी बनावट आधार कार्डआरोपी प्रितमने आपल्या आधार कार्डावर पीडित तरुणीचे नाव व फोटो टाकून दुसरे आधार कार्ड तयार केले. त्या बनावट आधार कार्डवरून मोबाईलचे सिमकार्ड विकत घेतले होते. त्याच क्रमांकावरून पीडित तरुणीला कॉलसुध्दा केला होता. तसेच प्रितमने परतवाडा येथील गजानन निस्ताने नावाच्या मित्राकडूनसुध्दा सिमकार्ड घेतले होते. मोबाईल ट्रेस करुन पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आहे.