लोकमत न्यूज नेटवर्कवरूड (अमरावती) : अपघाताचा बनाव करून प्रेमात आडकाठी ठरलेल्या पतीला पत्नीने बहिणीच्या नवऱ्याशी संगनमत करून ठार केले. घोगरा नाल्याच्या पुलाखाली २ एप्रिलला आढळलेल्या मृतदेहप्रकरणी तपासात धक्कादायक उलगडा झाला आहे. मृताचा साहू व पत्नीविरूद्ध शेंदूरजनाघाट पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला.
पोलिस सूत्रानुसार, किशोर प्रेमलाल युवनाते (३४, रा. खडकी, ता. प्रभात पट्टण, जि. बैतुल) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी शिवकला किशोर युवनाते (२१) व साडू मखन मनदेव धुर्वे (३२, रा. मेट, ता. जि. पांढुर्णा) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. करवार नाका ते पिपलागड रोडवर घोगरा नाल्यात पुलाखाली अपघातग्रस्त दुचाकी आणि किशोरचा मृतदेह आढळून आला होता. तो आजीसासूच्या अंत्यसंस्काराला हजर राहून मखनसमवेत खडकी येथे परत येत होता. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. नातेवाइकांची चौकशी केली असता, शिवकला व मखन यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. त्यानंतर शिवकला व मखनची चौकशी केली असता, किशोर प्रेमात अडथळा ठरत असल्याने त्याला संपविल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर, निरीक्षक किरण वानखडे ठाणेदार दीपक महाडिक, उपनिरीक्षक मंगेश शेगोकार, यांनी कारवाई केली.
दगडाने ठेचून केले ठार
मृत किशोर व मखन हे दुचाकीने गव्हारगोंदी या सासरहून अंत्यसंस्कार आटोपून येत असताना करवार नाका ते पिपलागड रोडवरील घोगरा नाल्याच्या पुलाखाली मखन यांने किशोरला थांबवून दगडाने त्याला ठार केले. यावेळी अपघाताचा बनाव करण्यासाठी मृतदेह पुलाखाली टाकला.
३ दिवसांची पोलिस कोठडी
शिवकला व मखन यांच्या कबुलीनंतर १९ एप्रिलला अपघाताच्या गुन्ह्यात वाढ करून कलम १०३ (१), २३८, ६१ (२), ३ (५) भारत न्याय संहिता अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. त्यांना २० एप्रिल रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Web Summary : A wife and her sister's husband murdered her husband, staging it as an accident near Warud, Amravati. Kishore Yuvanate was killed by his wife and her lover, who confessed to the crime. Both are now in police custody.
Web Summary : पत्नी और उसके बहनोई ने मिलकर पति की हत्या कर दी और उसे दुर्घटना का रूप दे दिया। अमरावती के वारुड के पास किशोर युवनते की हत्या उसकी पत्नी और प्रेमी ने की। दोनों ने अपराध कबूल कर लिया है और पुलिस हिरासत में हैं।