शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रेमेडीसिव्हिरचा तुटवडा कोरोनाशी कसे लढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 05:00 IST

अन्न व औषधी विभागाच्या माहितीनुसार, शासकीय रुग्णालात ७५०० व खासगीत २०० रेमडिसिव्हिर उपलब्ध असल्याचे असल्याचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांनी सांगितले. मात्र, या इंजेक्शनचा उपयोग होत असल्याने सध्या चार हजार व्हायल उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग सध्याही कमी झालेला नाही.   रोज ४०० च्या आसपास रुग्णांची नोंद होत आहे.

ठळक मुद्दे२३ कोरोना हॉस्पिटलसाठी २०० व्हायल उपलब्ध, संसर्ग कायम त्यात जिल्ह्याबाहेरील रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गात गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ‘रेमडिसिव्हिर’ इंजेक्शनचा या चार दिवसांत तुटवडा निर्माण झालेला आहे. शासकीय रुग्णालयांत उपलब्ध असले तरी खासगीत मात्र, मोठी किंमत मोजावी लागत आहे. मागणीनंतर पुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याने कोरोनाशी कसे लढणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे व अशा प्रतिकुल परिस्थितीत काळाबाजारात वाटेल ती किंमत मोजून रुग्णाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न नातेवाईक करीत आहेत.
अन्न व औषधी विभागाच्या माहितीनुसार, शासकीय रुग्णालात ७५०० व खासगीत २०० रेमडिसिव्हिर उपलब्ध असल्याचे असल्याचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांनी सांगितले. मात्र, या इंजेक्शनचा उपयोग होत असल्याने सध्या चार हजार व्हायल उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग सध्याही कमी झालेला नाही.   रोज ४०० च्या आसपास रुग्णांची नोंद होत आहे. यात किमान ८ ते १० टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत असतात. यापैकी काही शासकीय, तर काही रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल होतात. जिल्ह्यात २३ डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल आहेत. 
या रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरमध्ये रेमडिसिव्हिर विक्रीला असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय अन्य जिल्ह्यांतील रुग्णदेखील येथील डीसीएच सुविधेत उपचारार्थ दाखल होत असल्याने या इंजेक्शनची वाढती मागणी वाढली व त्यातुलनेत पुरवठा होत नसल्यानेच आता चढ्या भावाने विक्री होत असल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले. या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये, याकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशाने जिल्हास्तरावर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. 
समिती सदस्यांनी शनिवारी काही रुग्णालय व मेडिकल स्टोअरची तपासणी केली. याशिवाय केंद्रीय आरोग्य पथकाने रेमडिसिव्हिरचा काळाबाजार होऊ नये, अशी तंबी दिल्याने गांभीर्य वाढले आहे.
जिल्ह्यात पाच कंपन्यांचा पुरवठा
जिल्ह्यात सध्या झायडस, हेटेरो, मायलॉन, सिपला व ज्युबिलॉन या पाच कंपन्यांद्वारा पुरवठा होतो. शासकीय रुग्णालयांत हॉफकिनद्वारे पुरवठा होत आहे. या पाचही  कंपनींच्या रेमेडिसिविरचे दरमात्र, वेगवेगळे आहे. मागील आठवड्यात हेटेरोद्वारा ४०० व्हायलाचा पुरवठा करण्यात आला होता. रविवारी पुन्हा पुरवठा होणार होता. मात्र, स्टाॅकिस्टकडे माल नसल्याने  नकार दर्शविण्यात आला. आता प्रतीक्षा असल्याचे एफडीएचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांनी सांगितले.

२३ खासगी रुग्णालयांना २०० व्हायल कसे पुरणार?
एफडीएच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील २३ खासगी रुग्णालयांसाठी २०० व्हायल उपलव्ध असल्याचे सांगण्यात आले. या रुग्णालयांत आयसीयूमध्ये २३६, ऑक्सिजन बेडवर २३८ व व्हेंटिलेटरवर ३८ रुग्ण आहेत. आयसीएमआरच्या गाईडलाईनचा वापर केला तरी एवढा साठा पुरेसा नाही. त्यामुळे या इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अन्य जिल्ह्यांचे रुग्ण अमरावतीत
सध्या नागपूर, यवतमाळ, बुलडाणा आदी जिल्ह्यातील रुग्ण उपचारार्थ दाखल होत आहेत. गंभीर अवस्थेतील या रुग्णांसाठी नातेवाईक वाटेल ती किंमत मोजावयास तयार असल्याने या इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होत असल्याचे वास्तव आहे.

शासकीय रुग्णालयात रेमडिसिव्हिरचा वापर प्रोटोकॉलनुसार होतो.  सध्या चार हजार व्हायलचा साठा रुग्णासाठी पुरेसा आहे. जीव वाचणे महत्त्वाचे आहे. पीडीएमसीला उसनवार पद्धतीने ४०० व्हायल दिले आहेत.
- श्यामसुंदर निकम
 जिल्हा शल्यचिकित्सक

सध्या रेमडिसिव्हिरचे २०० व्हायल उपलब्ध आहेत व तेदेखील खासगी कोविड रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे चढ्या भावाने विक्रीची शक्यता नाकारता येत नाही. आमचा वॉच आहे.
- मनीष गोतमारे
 औषधी निरीक्षक, एफडीए

जिल्हधिकारी कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत प्रोटोकॉलनुसार व फाॅर्म भरल्यानंतरच इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. शासकीय रुग्णालयातूनही आवश्यकतेनुसार उसनवार घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत
- डॉ अनिल रोहणकर
 श्वसन विकारतज्ज्ञ

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस