शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

घर मोजणीला गालबोट कर्मचाऱ्यांना मारहाण

By admin | Updated: June 5, 2015 00:29 IST

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या निर्देशानुसार मंगळवारपासून शहरात सुरु झालेल्या घर मोजणी अभियानाला गुरुवारी गालबोट लागले.

गाडगेनगर पोलिसांत तक्रार : पॅराडाईज कॉलनी येथील घटनाअमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या निर्देशानुसार मंगळवारपासून शहरात सुरु झालेल्या घर मोजणी अभियानाला गुरुवारी गालबोट लागले. स्थानिक पॅराडाईज कॉलनी येथे घर मोजणीला विरोध करुन चक्क कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात महापालिका कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदविली आहे.महापालिका झोन क्र. १ अंतर्गत येणाऱ्या पॅराडाईज कॉलनी येथील रहिवासी मो.आबीद मो.कयामी यांच्या मालकीच्या इमारतीची मोजणी करण्यासाठी चमू घटनास्थळी पोहोचली. मो. आबीद यांच्या घराचे समोरचे दार बंद असल्याने त्यांनी मागील बाजूने जाऊन आवाज दिला असता घराच्या मागे उदबत्ती तयार करण्याचा कारखाना असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मो. आबीद यांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केली. आजूबाजूचे लोक याठिकाणी गोळा झाले. या प्रकाराने कर्मचारी हतबल झाले. त्यानंतर लगेच कर लिपिक भगिरथ खैरकर यांनी सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण व शिविगाळ करण्याचा प्रकार गंभीर असल्याने नरेंद्र वानखडे यांनी आयुक्त, उपायुक्तांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. त्यानंतर आयुक्तांच्या निर्देशांनुसार पोलिसांत तक्रार नोंदविली. उदबत्ती कारखाना अनधिकृत असल्यानेच कारवाईला विरोध झाल्याची चर्चा होती. अगरबत्ती कारखान्याचे बांधकाम तपासूपॅराडाईज कॉलनीतील मो.आबीद यांच्याकडे घरमोजणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना घराच्या मागच्या बाजूला उदबत्ती तयार करण्याचा कारखाना दिसून आला. या कारखान्याला परवानगी आहे किंवा नाही? हे तपासले जाईल. बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा आदी बाबी तपासल्यानंतर या कारखान्यावर कारवाई प्रस्तावित केली जाणार, असे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.तिसऱ्या दिवशी ११११ घरांची मोजणीघर मोजणी अभियानात तिसऱ्या दिवशी १,१११ घरांची मोजणी करण्यात आली. यात झोन क्र.एक ते पाचमध्ये अनुक्रमे ३१०,२४९, ५२, ३४८ व१५२ घरांची मोजणी केल्याची माहिती मुख्य मूल्यांकन, कर निर्धारणअधिकारी देशमुख यांनी दिली. मोहीम निरंतर सुरु राहील, असेही त्यांनी सांगितले.