शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गृह विभागाचे मोठे पाऊल ! ९२३ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:20 IST

Amravati : ८६१ 'ब्लॅक स्पॉट'वर वॉच; ५जीसह 'इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' कार्यान्वित केली जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी गृह विभागाने एक मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील एकूण २१,४०० किमी लांबीच्या रस्त्यांवरील ८६१ अपघातप्रवण क्षेत्रांवर 'ब्लॅक स्पॉट्स' आता 'इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' कार्यान्वित केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ९२३.०५ कोटी रुपयांच्या खर्चाला गृह विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे बिनतारी वायरलेस तंत्रज्ञानावर आधारित असेल. यासाठी ४ जी आणि ५ जी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

...अशी आहे तरतूद

पश्चिम महाराष्ट्र व कोकण : पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर यांसारख्या शहरांसाठी ३१५.५४ कोटी
मराठवाडा : छ. संभाजीनगर, नांदेड, लातूर आणि जळगावसह इतर जिल्ह्यांसाठी ३१४.९६ कोटी
विदर्भ : नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या भागातील यंत्रणेसाठी २३२.५५ कोटी

२४ तास निगराणी, सौरऊर्जेवर चालणार उपकरणे

विद्युत ऊर्जेसाठी सौरऊर्जेचा किंवा उपलब्ध स्रोतांचा वापर केला जाईल. यामुळे रस्ते सुरक्षेवर रिअल-टाइम लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेबाबत दिलेल्या निर्देशांनुसार स्थापन करण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा निधी नियंत्रण समिती'ने या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला होता. दरम्यान, या प्रकल्पाची व्याप्ती मोठी असल्याने त्याचे विभाजन तीन मुख्य विभागात करण्यात आले आहे.
या यंत्रणेद्वारे प्रामुख्याने मोकळ्या महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या 3 वाहनांवर आपोआप कारवाई होईल. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी 'रियल टाइम अलर्ट' मिळतील. तथा नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट वाहनधारकाच्या मोबाइलवर आणि नियंत्रण कक्षात माहिती दिली.

अपघातांवर नियंत्रण मिळविण्याचे लक्ष्य

  • या अद्ययावत प्रणालीमुळे अतिवेग, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवता येईल, ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण घटण्यास मदत होईल.
  • संपूर्ण प्रकल्पाच्या वीज जोडणीसाठी स्वतंत्र ६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विदर्भातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि महत्त्वाच्या जिल्हा मार्गावरील अशा ठिकाणांची निवड करण्यात आली आहे, जिथे अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासाठी अपघातांची जास्त संख्या असणारे मार्ग आणि जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे. सबंधित जिल्ह्याला निधी देऊन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Allocates ₹923 Crore to Reduce Road Accidents

Web Summary : Maharashtra's Home Department approved ₹923 crore for an Integrated Traffic Management System. It will cover 21,400 km of roads across 36 districts, targeting 861 'black spots'. The wireless system uses 4G/5G for real-time monitoring and automatic action against traffic violations, aiming to reduce accidents and fatalities.
टॅग्स :Amravatiअमरावतीroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात