१.३५ लाख विद्यार्थ्यांना पाठविणार हॉलतिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 05:00 AM2020-10-16T05:00:00+5:302020-10-16T05:00:38+5:30

ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीच्या परीक्षांचे २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान नियोजन करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यापीठाद्वारे घेण्यात येत आहे. दरम्यान बहि:शाल, बॅकलॉग अशा ४५ हजार विद्यार्थ्यांच्याही परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, तांत्रिक कारणांनी १२ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या. आता या परीक्षा २० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.

Holtikit to be sent to 1.35 lakh students | १.३५ लाख विद्यार्थ्यांना पाठविणार हॉलतिकीट

१.३५ लाख विद्यार्थ्यांना पाठविणार हॉलतिकीट

Next
ठळक मुद्देविद्यापीठात परीक्षेची तयारी जोरात : प्रवेशपत्र तपासणीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : २० ऑक्टोबरपासून होणाऱ्या अंतिम वर्ष परीक्षेच्या अनुषंगाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने जोरदार तयारी चालविली आहे. परीक्षांचे ऑनलाईन कामकाज ह्यसुरळीतह्ण होण्यासाठी पहिला टप्पा म्हणून गुरुवारी विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली. एक-दोन दिवसात १.३५ लाख विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट महाविद्यालयांत ई-मेलद्वारे पाठविले जाईल.
ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीच्या परीक्षांचे २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान नियोजन करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यापीठाद्वारे घेण्यात येत आहे. दरम्यान बहि:शाल, बॅकलॉग अशा ४५ हजार विद्यार्थ्यांच्याही परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, तांत्रिक कारणांनी १२ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या. आता या परीक्षा २० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.
यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यानचे पेपर सोयीच्या तारखांमध्ये घेण्यात येतील. त्यानुसार नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. गुरुवारी सांयकाळपर्यंत वेळापत्रक तयार होताच ते अधिकृतपणे जाहीर केले जातील, अशी माहिती आहे. मानव्यविद्या, वाणिज्यविद्या, सायन्स व अभियांत्रिकी आणि आंतरविद्या अशा चारही विद्या शाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

हॉलतिकीटमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यात येत आहे. त्यानंतर महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर ते पाठविले जातील. साधारणत: १.३५ लाख विद्यार्थ्यांपर्यंत हॉलतिकीट पोहचविल्या जात आहेत. २० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्य परीक्षेत कोणत्याही उविणा असू नये, अशी तयारी सुरू आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अमरावती विद्यापीठ

परीक्षा विभागात कुलगुरूंची नियमित बैठक
ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोनही पद्धतीच्या परीक्षांचे नियोजन सुरू झाले आहे. गत चार दिवसांपासून कुलगुरू मुरलीधर चांदेकर हे परीक्षा विभागात ठाण मांडून आहेत. परीक्षेची जबाबदारी असलेल्या नागपूर येथील एजन्सीच्या प्रतिनिधींशी चर्चा, ऑनलाईन परीक्षेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, अँप डाऊनलोड, पीडीएफ फाईल, परीक्षेची पद्धत, पेपर सबमीट करण्याची प्रणाली आदींविषयी कुलगुरू बारकाईने हाताळत आहेत. दररोज दोन ते तीन तसा कुलगुरू परीक्षा विभागात देत असल्याची माहिती आहे.
कॉलेजच्या मेलवर हॉलतिकीट जनरेट
अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३८३ महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर परीक्षांचे हॉलतिकीट पाठविले जाणार आहे. तांत्रिक बाबी तपासल्या जात असून, शुक्रवारपासून विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट जनरेट होतील, असे संकेत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांचे हॉलतिकीट महाविद्यालयातून घ्यावे लागणार आहे. हॉल तिकिटावरच परीक्षासंदर्भाची माहिती नमूद आहे.

Web Title: Holtikit to be sent to 1.35 lakh students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.