शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीतील घरकुल लाभार्थींचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

अमरावती : प्रहार पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वामध्ये मोर्शीतील शेकडो घरकुल लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बुधवारी धरणे आंदोलन ...

अमरावती : प्रहार पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वामध्ये मोर्शीतील शेकडो घरकुल लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बुधवारी धरणे आंदोलन केले. अतिक्रमण नियमानुकूल करण्याची त्यांची मागणी आहे. शासन निर्णय २०११ पूर्वीचे शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे शासनाने जाहीर केले होते. यादरम्यान मोर्शी नगर परिषद हद्दीत ९६३ लाभार्थींना शासनाने घरकुल मंजूर केले. त्यामधील ३२१ लाभार्थी अतिक्रमणधारक होते. यामधील १९४ अतिक्रमण पात्र असून, त्याबाबत प्रस्ताव जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. परंतु, अतिक्रमण नियमानुकूल करून घरकुलाचा लाभ देण्याबाबत अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे, या मागणीसाठी मोर्शी शहरातील अतिक्रमणधारक जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचे धरणे प्रदर्शन करण्यात आले. शासनाने याबाबत निर्णय न दिल्यास पंधरा दिवसांनी राहुटी आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी मोर्शी येथील नगरसेवक नईम खान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव फुके, प्रहार विद्यार्थी संघटनेचे रवि परतेती, दानिश अहमद, समीर खान, जावेद हुसेन,अब्दुल इर्शाद, शकूर शाह, मनोज इडपाची, सुनीता कुमरे, इकबाल सय्यद, अनिल कुईटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.