शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्व रॅलीने वेधले शहरवासीयाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:06 IST

महानगर शिवसेनेचा उपक्रम : बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अमरावती : हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ ...

महानगर शिवसेनेचा उपक्रम : बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

अमरावती : हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात हिंदुत्व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नेहरू मैदान येथून प्रारंभ झालेल्या रॅलीने शहराच्या विविध भागांत पोहोचून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी रॅलीत दुचाकीवर स्वार शिवसैनिकांनी भगवे फेटे, हातात भगवे झेंडे घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत शहर दणाणून सोडले.

विशेष म्हणजे, महिला शिवसैनिकांनी भगवे वस्त्र परिधान करून, फेटे बांधून हिंदुत्व रॅलीत लक्षणीय सहभाग घेतला होता. रॅलीचा समारोप साईनगर येथील साईमंदिर परिसरात करण्यात आला. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ, अनंत गुढे, माजी आमदार अभिजित अडसूळ, ज्ञानेश्वर धाने पाटील, महानगरप्रमुख पराग गुडधे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, दिनेश बूब, सुनील खराटे, सहसंपर्कप्रमुख प्रशांत वानखडे, नाना नागमोते, महिला आघाडीप्रमुख मनीषा टेंभरे, वर्षा भोयर, स्वाती निस्ताने, जयश्री कुरेकर, अर्चना धामणे, नीलिमा चावके, सारिका जयस्वाल, नितीन हटवार, पंजाबराव तायवाडे, नरेंद्र निर्मळ, दिगबंर मानकर, सुनील राऊत, प्रवीण अडसपुरे, गोपाल राणे, मुन्ना शर्मा, बाळा सावरकर, मोहन क्षीरसागर, विकास शेळके, कैलास अवघड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.