शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरबाजार नगरपरिषदेला हायकोर्टाचा दणका

By admin | Updated: May 8, 2015 00:23 IST

चांदूरबाजार नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रादेशिक विकास योजनेंतर्गत अनेक जमिनी विविध उपयोगांकरिता आरक्षित करण्यात आल्या होत्या.

सुरेश सवळे चांदूरबाजारचांदूरबाजार नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रादेशिक विकास योजनेंतर्गत अनेक जमिनी विविध उपयोगांकरिता आरक्षित करण्यात आल्या होत्या. ृचांदूरबाजार-मोर्शी मार्गावरील स्मशानभूमीसमोरील टोम्पे ले-आऊट मधील ३२ गुंठे शेत उद्यानासाठी आरक्षित होते. टोम्पे यांनी हायकोर्टात आरक्षण हटविण्याबाबत याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने टोम्पे लेआऊटमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. टोम्पे लेआऊटचे मालक भास्कर टोम्पे यांनी चांदूरबाजार पालिकेकडे त्यांच्या जागेवरील उद्यानाचे आरक्षण हटविण्याकरिता एक पत्र लिहिले होते. मात्र, सत्ताधारी पक्षाने सर्वानुमते ठराव संमत करून आरक्षण हटविण्याला विरोध दर्शविला होता. तसेच जमीन खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. यानंतरही टोम्पे यांनी पालिकेसोबत सतत पत्रव्यवहार केला. परंतु स्थानिक राजकारण व राजकीय नेत्यांच्या दबावामुळे कारवाई झाली नाही. त्यानंतर भास्कर टोम्पे यांनी सन २०१३ मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेऊन हे आरक्षण हटविण्याबाबतची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आरक्षण हटविण्याचा निर्णय दिला होता. नगरपरिषदेची विनंती डावललीचांदूरबाजार : या दोन सदस्यीय खंडपीठाने याप्रकरणाची सुनावणी केली. यावेळी या निर्णयाचा नगरपरिषदद्वारे चांगलाच विरोध करण्यात आला. राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र देऊनसुद्धा आरक्षण न हटविण्याची विनंती करण्यात आली. परंतु नियमान्वये भाष्कर टोम्पे यांचा मजबूत पक्ष असल्याने न्यायामूर्ती वासंती ए. नाईक व न्यायमूर्ती ए. एम. ब्रदरच्या दोन बेंचवाल्या खंडपीठाने आपल्या सुनावणीत टोम्पे लेआऊटच्या बगिच्यासंबंधी आरक्षित जमीन हटविण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या उपरोक्त आदेशानंतर नगरपरिषदेला जोरदार झटका लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाष्कर टोम्पे यांच्याकडून अ‍ॅड. आबीद हुसेन व अ‍ॅड. आर. जे. मिर्झाने तर नगरपरिषदेकडून धात्रक तर सरकार पक्षाकडून एस. एम. भांगडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)