धवनेवाडीमध्ये माकडांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:12 IST2021-02-15T04:12:33+5:302021-02-15T04:12:33+5:30

धामणगाव रेल्वे: येथील धवणेवाडी परिसरात एक महिन्यांपासून माकडांनी हैदोस घातला आहे. परिणामी, तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. ...

Haidos of monkeys in Dhawanewadi | धवनेवाडीमध्ये माकडांचा हैदोस

धवनेवाडीमध्ये माकडांचा हैदोस

धामणगाव रेल्वे: येथील धवणेवाडी परिसरात एक महिन्यांपासून माकडांनी हैदोस घातला आहे. परिणामी, तेथील नागरिक भयभीत झाले आहेत.

धवणेवाडी ही शहरातील कर्मचारी तसेच मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. नजीकच्या परसोडी रस्त्यावर झाडाझुडपात माकडांचे वास्तव्य होते. मात्र, त्या भागातील झाडेझुडुपे कापून तेथे ले-आऊट टाकण्यात आले. तेव्हापासून तेथील माकडांच्या कळपाने आपला मोर्चा धवणेवाडीकडे वळविला आहे. धवणेवाडी परिसरात काम करणाºया महिला तसेच लहान मुलांवर ती माकडे धाव घेतात. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरावरील पाईप लाईन, पाण्याची टाकी, फुलझाडे, कुंड्याचे नुकसान ते माकडे करतात. वनविभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Haidos of monkeys in Dhawanewadi