धारणी येथून ६.६० लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:12 IST2021-01-02T04:12:02+5:302021-01-02T04:12:02+5:30

धारणी : मावळत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातून सुमारे ६.६० लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी येथील तीन ...

Gutka worth Rs 6.60 lakh seized from Dharani | धारणी येथून ६.६० लाखांचा गुटखा जप्त

धारणी येथून ६.६० लाखांचा गुटखा जप्त

धारणी : मावळत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातून सुमारे ६.६० लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी येथील तीन गुटखा तस्करांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तिघांनाही अटक करण्यात आली.

शहरातील मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये लाखो रुपयांचा गुटखा येत असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी आयपीएस तथा ठाणेदार निकेतन कदम यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान सदर प्रतिष्ठानावर धाड घातली. दुकान व गोडाऊन एकच असल्याची बतावणी व्यापाऱ्यांनी केली. मात्र, कदम यांनी गोडाऊनचा शोध घेतला. मोहम्मद शरीफ अब्दुल हबीब याच्या आसिफ ट्रेडर्सच्या गोडाऊनमधून ३ लाख ८३ हजार ९८६ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. लतीफ उर्फ लीलाधर पूनमचंद मालवीय याच्या प्रजापती ट्रेडर्सच्या गोडाऊनमधून १ लाख ९४ हजार ७२९ रुपयांचा, तर हुकूमचंद राजाराम मालवीय याच्या मालकीच्या राज किराणाच्या गोडाऊनमधून ८२ हजार १८९ रुपये असा एकूण ६ लाख ६० हजार ९०४ रुपयांचा गुटखा, सुगंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. तिन्ही ‘गुटखा किंग’विरुद्ध भादंविचे कलम १८८, २६९, २७२, २७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

--------------

Web Title: Gutka worth Rs 6.60 lakh seized from Dharani