शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सालबर्डीत शिवभक्तांची मांदियाळी

By admin | Updated: February 15, 2015 00:09 IST

मध्य प्रदेश शासनाच्या नियंत्रणात असलेले ‘शिवलिंग’ आणि महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणात असलेली ‘सालबर्डी यात्रा’ ही दोन्ही राज्याच्या शिवभक्तांना ...

लोकमत विशेषचांदूरबाजार : मध्य प्रदेश शासनाच्या नियंत्रणात असलेले ‘शिवलिंग’ आणि महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणात असलेली ‘सालबर्डी यात्रा’ ही दोन्ही राज्याच्या शिवभक्तांना जोडणारी सातपुड्याच्या निसर्गरम्य परीघ आपले वेगळे अस्तित्व राखून आहे. याच ठिकाणी महानुभावाचे दैवत चक्रधर स्वामी यांनी धारण केलेले मौनव्रत व ८८ वर्षांपूर्वी राष्ट्रसंतांनी या ठिकाणी केलेला महायज्ञ, या घटनांची सालबर्डी यात्रा साक्षीदार आहे.पांडवांच्या अज्ञातवासाचा साक्षीदार असलेल्या या ठिकाणाला सुमारे ७०० वर्षांची परंपरा आहे. दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत लाखो शिवभक्त हजेरी लावतात. मध्यप्रदेश शासनाच्या हद्दीत सातपुड्याच्या नैसर्गिक कुशीत ६५० फूट उंचीवर विशाल दगडातून प्राचीन शिवगुफेतील शिवलिंगावर अखंड पाण्याचा अभिषेक सुरू आहे. देशात बारा ज्योतिर्लिंग ज्याप्रमाणे प्रसिध्द आहेत. त्यापैकी सालबर्डीला लहान महादेव म्हणून स्थान आहे. ज्या शिवभक्तांना पचमढीच्या मोठ्या महादेवाला जाणे शक्य होत नाही ते सालबर्डीला भेट देतात. महादेवाचे दर्शन घेण्याकरिता शिवभक्तांना तीन कि.मी. उंचावर पायी चालून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागते. येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. माळू नदीच्या काठावर थंड-गरम पाण्याचे झरे असून हे ठिकाण ‘सीतेची न्हाणी’ म्हणून प्रसिध्द आहे. या पाण्याने चर्मरोग असणाऱ्याने नियमित आंघोळ केल्यास चर्मरोग कायमचा नाहीसा होतो, अशी श्रद्धा आहे. याशिवाय पुरुषोत्तम श्रीरामाच्या अश्वमेघ यज्ञातील श्यामवर्ण घोड्याच्या टाचा समान खुणा आजही सालबर्डीच्या पर्वतरांगात ठिकठिकाणी आढळून येतात.याच पर्वतरांगात पुरातन अशी पांडव कचेरी आहे. दगडी फरशाव्दारे कोरीव काम केलेले मोठे सभागृह आहे. ही पांडव कचेरी हेमाडपंथी मंदिराच्या आकाराची आहे. सभोवताल परकोट बांधला असून भग्नावस्थेत आहे. पहिली पायरी चढल्यांनर थोड्या अंतरावर माडू नदी व गंगानदीचा संगम असून या दोन्ही नदांच्या काठावर पूर्वेस राममंदिर तर पश्चिमेस चक्रधर स्वामींचे मोठे मंदिर आहे. चक्रधर स्वामींनी या ठिकाणी मौनव्रत धारण करुन तपस्या केली होती. पंचकृष्णांपैकी त्यांना पाचवे कृष्ण समजले जाते. महानुभावांची याठिकाणी वर्षभर वर्दळ राहते. येथील कृष्णाची मूर्ती अप्रतिम आहे. याच पर्वतात सासारक्षण संस्थान आहे. सन १९२५ दरम्यान याठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘महायज्ञ’ केला होता. आज येथे राष्ट्रसंतांचे प्रशस्त मंदिर आहे. याठिकाणी शिवरात्रीच्या पर्वावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. शिवगुफेत जाताना हनुमानाची कोरीव मूर्ती आहे. शिवभक्तांना पायऱ्या चढत शिवगुफेपर्यंत जावे लागते. येथून विशाल पहाडातून पाण्याचे झिरपणे सुरु झाल्याचे दिसते. येथे पोहोचण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी जादा बसेत सोडण्यात येतात. महाशिवरात्रीनिमित्त सालबर्डीत भक्तांची प्रचंड गर्दी दिसून येऊ लागली आहे. प्रशासनही सुसज्ज आहे. (तालुका प्रतिनिधी)