शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

४० प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्र्यांचा दिलासा

By admin | Updated: February 19, 2015 00:24 IST

नांदगाव पेठ येथील सोफिया वीज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. या प्रकल्पग्रस्तांनी नोकरीत सामावून घेण्याकरिता आंदोलनाचा इशारा दिला होता.

अमरावती : नांदगाव पेठ येथील सोफिया वीज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. या प्रकल्पग्रस्तांनी नोकरीत सामावून घेण्याकरिता आंदोलनाचा इशारा दिला होता. याची पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दखल घेत तातडीने इंडिया बुल्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांचे मुद्द्यांवर चर्चा केली. यानंतर ४० प्रकल्पग्रस्तांना इंडिया बुल्स कंपनीत सामावून घेण्याचा निर्णय या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने घेतला आहे.नांदगाव पेठ परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर कोट्यवधी रूपयांचा सोफिया प्रकल्प उभारला आहे. त्या प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलने केली. त्यानंतरही त्याची दखल घेण्यात आली नव्हती. म्हणून प्रकल्पग्रस्तांनी पालकमंत्री पोटे यांचे निवासस्थानासमोर १८ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. यांची दखल घेत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी इंडिया बुल्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्याबाबत विस्तृत चर्चा केली. यानुसार प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या निकाली काढण्याची हमी पोटे यांनी दिली. याशिवाय ४० प्रकल्पग्रस्तांना येत्या १५ मार्चपर्यंत नोकरीत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे नियोजित आंदोलन स्थगित केले आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे आणि जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या प्रयत्नाने प्रकल्पग्रस्तांचा तिढा तूर्तास सुटल्याने प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे आभार मानले. यावेळी प्रकल्पग्रस्त (प्रतिनिधी)