आजोबांना रिचार्ज पडले महागात ! ६४ वर्षीय शेतकरी 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात, दाम्पत्याने उकळले ७० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:15 IST2026-05-13T13:14:05+5:302026-05-13T13:15:03+5:30

Amravati : पोलिस आयुक्तालय हद्दीत नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात एका ६४ वर्षीय शेतकऱ्याला 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून त्याच्याकडून तब्बल ७० लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा थरार उघड झाला आहे.

Grandfather's 'recharge' cost a fortune! 64-year-old farmer falls into 'honey trap', couple loses Rs 70 lakh | आजोबांना रिचार्ज पडले महागात ! ६४ वर्षीय शेतकरी 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात, दाम्पत्याने उकळले ७० लाख

Grandfather's 'recharge' cost a fortune! 64-year-old farmer falls into 'honey trap', couple loses Rs 70 lakh

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
पोलिस आयुक्तालय हद्दीत नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात एका ६४ वर्षीय शेतकऱ्याला 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून त्याच्याकडून तब्बल ७० लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा थरार उघड झाला आहे.

पोलिस सुत्रांनुसार, पीडित शेतकरी हे नांदगाव पेठ परिसरातील रहिवासी आहेत. त्यांचे अमरावती शहरात राधानगरमध्ये घर आहे. त्यांची ओळख गाडगेनगर भागात एका मोबाइल शॉपी आणि झेरॉक्स दुकान चालवणाऱ्या दाम्पत्याशी झाली. सुरुवातीला फक्त मोबाइल रिचार्ज आणि झेरॉक्स काढण्यासाठी जाणाऱ्या या शेतकऱ्याला त्या दुकानदाराच्या पत्नीने आपल्या सौंदर्याच्या आणि गोड बोलण्याच्या जाळ्यात ओढले. दोघांमधील ओळख वाढत गेली. त्यातून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र, हे संबंध म्हणजे एका मोठ्या कटाचा भाग होते.

दाम्पत्याचा खरा चेहरा उघड

एकदा जाळ्यात अडकल्यानंतर आरोपी दाम्पत्याने खरा चेहरा दाखवला. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देऊन या दाम्पत्याने गेल्या चार वर्षांत टप्प्याटप्प्याने वृद्ध शेतकऱ्याकडून तब्बल ७० लाख रुपये उकळले. आपली बदनामी होईल, या भीतीने पीडित शेतकरी निमूटपणे पैसे देत राहिला. मात्र, ही मागणी थांबत नसल्याचे पाहून अखेर त्यांनी पोलिसांचे दार ठोठावले. हा प्रकार ११ मे रोजी रात्री उशिरा उघडकीस आला. पीडित शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिला आणि तिच्या पतीविरूद्ध खंडणीसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामागे मोठी टोळी सक्रिय आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
 

Web Title : हनी ट्रैप में फंसे बुजुर्ग किसान, ₹70 लाख का नुकसान

Web Summary : अमरावती में एक 64 वर्षीय किसान को एक जोड़े ने हनी ट्रैप में फंसाया और झूठे बलात्कार के आरोप लगाने की धमकी देकर चार वर्षों में ₹70 लाख वसूले। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Elderly Farmer Scammed in Honey Trap, Loses ₹70 Lakh

Web Summary : A 64-year-old farmer was honey-trapped by a couple in Amravati, who extorted ₹70 lakh over four years by threatening false rape charges. Police are investigating the crime and potential accomplices after the farmer reported the extortion.