शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भटके-विमुक्तांच्या संरक्षणासाठी सरकारचे कवच! राज्य, जिल्हा व उपविभागीय स्तरावर समित्या गठित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 23:13 IST

शासन आदेश निर्गमित; अत्याचार रोखण्यासाठी आणि विकासासाठी ठोस पाऊल

अमरावती : भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अमानवीय अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. 'इतर मागास बहुजन कल्याण विभागा'मार्फत २४ एप्रिल २०२६ रोजी विशेष शासन निर्णय निर्गमित करून राज्य, जिल्हा आणि उपविभागीय अशा तिन्ही स्तरांवर समन्वय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे उपेक्षित असलेल्या या समाजाला आता न्याय आणि हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

राज्य स्तरावर मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या कार्यरत राहतील. उपविभागीय स्तरावरही या समित्यांचे जाळे विस्तारण्यात आले आहे. समाजातील अमानवीय घटना कमी करणे, अत्याचारांना प्रतिबंध करणे आणि पीडितांना त्वरित मदत मिळवून देणे, ही या समितीची मुख्य जबाबदारी असणार आहे.

काय असतील अधिकार आणि जबाबदारी?

अत्याचार निवारण : भटके-विमुक्त समाजावर होणाऱ्या अन्यायाचा निपटारा करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाशी समन्वय साधणे.योजनांची अंमलबजावणी : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे.पुनर्वसन : बेघर किंवा फिरस्त्या कुटुंबांना हक्काचे घर आणि कायमस्वरूपी निवारा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे.रोजगार व शिक्षण : समाजातील तरुणांना कौशल्य विकास आणि रोजगाराची साधने उपलब्ध करून देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व निवासाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे.

भटके-विमुक्त समाजात कोणाचा समावेश?

या श्रेणीत प्रामुख्याने विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या दोन मुख्य वर्गांचा समावेश होतो. यात बंजारा, लमाण, धनगर, वंजारी, कैकाडी, वडार, पारधी, कोल्हाटी, डोंबारी, घिसाडी, गोसावी, नाथपंथी डवरी गोसावी, बहुरूपी, झिंगाभोई अशा अनेक जातींचा समावेश असून, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर अ, ब, क, ड अशा गटांत विभागणी केली आहे.

शासकीय योजनांचा मिळणार थेट लाभ

या समित्यांमुळे आता समाजाला जात प्रमाणपत्र मिळवणे, घरकुल योजना, व्यावसायिक कर्ज (थेट कर्ज योजना), विशेष शैक्षणिक सवलती आणि आश्रमशाळांच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध होईल. अत्याचार झाल्यास केवळ गुन्हे दाखल न होता, त्या कुटुंबाचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन करण्यावरही या समितीचा भर असेल.

हा शासन निर्णय समाजातील अमानवीय प्रथांना आळा घालण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक 'गेम चेंजर' ठरेल, असा विश्वास आहे. त्यामुळे भटके-विमुक्तांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि रोजगारांचे प्रश्न सुटतील.- सुरेश पंचारे, बडनेरा.

English
हिंदी सारांश
Web Title : Government shield for nomadic tribes: Committees formed for protection.

Web Summary : To protect nomadic tribes, the government has formed committees at state, district, and sub-divisional levels. These committees will address injustice, implement welfare schemes, facilitate resettlement, and improve access to education and employment, ensuring their social and economic upliftment.
टॅग्स :Amravatiअमरावती