शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भांडणे मिटविण्यासाठी शासनाचे एक कोटी रूपये खर्च

By admin | Updated: December 20, 2014 00:18 IST

महाराष्ट्र शासनाने तंटामुक्त गाव मोहीम सुरू केल्यापासून एकट्या अंजनगाव सुर्जी तालुक्यात बक्षिसापोटी या मोहिमेवर गेल्या पाच वर्षांत एक कोटी रूपये खर्च करण्यात आले.

अंजनगाव सुर्जी : महाराष्ट्र शासनाने तंटामुक्त गाव मोहीम सुरू केल्यापासून एकट्या अंजनगाव सुर्जी तालुक्यात बक्षिसापोटी या मोहिमेवर गेल्या पाच वर्षांत एक कोटी रूपये खर्च करण्यात आले. खर्च करण्यात आलेल्या रकमेचा उपयोग संबंधित गावांना किती प्रमाणात झाला? हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन अंतर्गत पांढरी खानमपूरला पाच लाख, भंडारज, टाकरखेडा मोरे व दहिगाव रेचाला प्रत्येकी चार लाख व धनेगावला तीन लाख रूपये बक्षिसादाखल देण्यात आले आहेत. या पोलीस स्टेशनला बक्षिसांची रक्कम आतापर्यंत ५९ लाख रूपये प्राप्त झाली. रहिमापूर पोलीस ठाण्यातील गावांना २३ लाख रूपये, खल्लार पोलीस ठाण्यातील गावांना १८ लाख रूपये देण्यात आले आहेत.
अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यांतर्गत यापूर्वी चौसाळा ग्रामपंचायतीला पाच लाख, निमखेड बाजार व अडगाव खाडेला प्रत्येकी चार लाख, तुरखेड व कारला प्रत्येकी तीन लाख, बोराळा, दख पोही, शेलगांव, हिरापुरला प्रत्येकी अडीच लाख रूपये, जवळा, खोडगांव, हंतोडा, खिरपाणी, लखाड, खिराळा या गावांना प्रत्येकी दोन लाख व काकदरी या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावाला एक लाख रूपये देण्यात आले.
रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सातेगावला सात लाख, कुंभारगाव आणि मुऱ्हादेवीला प्रत्येकी तीन लाख, खिरगव्हाण, काळगव्हाण, वनोजा, सोनगावला प्रत्येकी दोन लाख रूपये, वरूडा व मलकापूर ग्रामपंचायतला प्रत्येकी एक लाख रूपये देण्यात आले असून कापूसतळणी, एकलारा, जवर्डी, हिंगणी व गावंडगाव ही गांवे बक्षिसास पात्र ठरली आहेत. खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत कसबेगव्हाण, कोकर्डा, साखरी, शेंडगाव या गावांनाही लवकरच बक्षीस प्राप्त होणार आहे.
बक्षिसांचा विनियोग कसा करावा याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत व हे अधिकार ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला न देता ग्रामसभेला देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणाबरोबरच या पुरस्काराचे देखील लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. मात्र एका चांगल्या हेतूने सुरूवात झालेल्या शासनाच्या या मोहिमेची दखल जागतिक पातळीवर अन्य राष्ट्रांनी घेतली असली तरी बक्षिसांची रक्कम ग्रामपंचायत सरपंच व सचिव खर्च करतात. ज्या तंटामुक्ती अध्यक्षाने गावात भांडणे मिटविण्याचा प्रयत्न केला त्याला फक्त बक्षिस वितरणाच्या वेळी फोटो पुरते बोलावण्यात येते. खर्च कुठे करावा याबाबत त्याला अजिबात विचारण्यात येत नाही, अशी खंत टाकरखेडा मोरे येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष विनायक तायडे यांनी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)