चार दिवसांत सुरू होणार शासकीय कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:11 IST2020-12-26T04:11:10+5:302020-12-26T04:11:10+5:30

यशस्वी चर्चा : दर्यापुरात कापूस नेण्याचा भुर्दंड वाचणार अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापसाची नोंदणी अंजनगावात, तर खरेदी दर्यापुरात, ...

Government cotton procurement will start in four days | चार दिवसांत सुरू होणार शासकीय कापूस खरेदी

चार दिवसांत सुरू होणार शासकीय कापूस खरेदी

यशस्वी चर्चा : दर्यापुरात कापूस नेण्याचा भुर्दंड वाचणार

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापसाची नोंदणी अंजनगावात, तर खरेदी दर्यापुरात, ही समस्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर पालकमंत्र्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना निर्देश देऊन येत्या चार ते पाच दिवसांत अंजनगाव शासकीय कापूस खरेदीचा मार्ग प्रशस्त केला.

आमदार बळवंत वानखडे, बाजार समितीचे सभापती अरुण खारोडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू, बाजार समितीचे संचालक गजानन दुधाट, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय हाडोळे, कापूस आंदोलनाचे माणिकराव मोरे, पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, पणन महासंघाचे प्रभारी व्यवस्थापक कांबळे यांनी याबाबत पालकमंत्र्यांसोबत चर्चा केली. २५ डिसेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या अमरावतीच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला.

-----------------

Web Title: Government cotton procurement will start in four days