शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील उर्दू माध्यमाच्या शाळांवर गंडांतर

By admin | Updated: May 30, 2016 23:57 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील सायन्सस्कोर, अ‍ॅकॅडमिक हायस्कूल व अन्य...

अमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील सायन्सस्कोर, अ‍ॅकॅडमिक हायस्कूल व अन्य तीन अशा पाच शाळांमधील उर्दू व हिंदी माध्यमाच्या तुकड्याना शिक्षण विभागाने यंदा संचमान्यता नाकारली आहे. परिणामी या शाळांमधील जवळपास ४२ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे येथील उर्दू व हिंदी माध्यम बंद होण्याची शक्यता बळावली आहे.जि.प. शिक्षण विभागाच्या कार्यकक्षेत शहरातील सायन्सस्कोर, अ‍ॅकॅडमिक हायस्कूल आणि जिल्ह्यातील धारणी, तळेगाव दशासर, अचलपूर याठिकाणी उर्दू माध्यमाचे शिक्षण मागील कित्येक वर्षांपासून दिले जाते. मात्र, शिक्षण विभागाने यावर्षी सायन्सस्कोर शाळेत आतापर्यंत सुरू असलेल्या मराठी, हिंदी आणि उर्दू या तीन माध्यमातून शिक्षण दिले जात होते. यासाठी या शाळेत तीनही माध्यमे मिळून २७ शिक्षक कार्यरत आहेत. उर्दू आणि हिंदी माध्यमांना शिक्षण विभागाने माध्यमनिहाय संचमान्यता नाकारली आहे. त्यामुळे या शाळेतील १२ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभागाने तीनही तुकड्यांची पटसंख्या एकत्रित दाखविण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांनी माध्यमनिहाय मान्यता देण्यात येऊ नयेत, अशा सूचना दिल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. संचमान्यता नाकारल्याने हे १२ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. याशिवाय अ‍ॅकेडेमिक हायस्कूलमधील उर्दू माध्यमाला संचमान्यता दिली नसल्याने या शाळेतील ७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. हीच परिस्थिती जिल्ह्यातील इतरही उर्दू माध्यमांची झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे उर्दू व हिंदी माध्यमाचे जवळपास २५ शिक्षक केवळ माध्यमनिहाय संचमान्यता नाकारल्यामुळे अतिरिक्त ठरले आहेत. शिक्षण विभागाने सुरू केलेली समायोजनाची प्रक्रिया थांबविल्यास अतिरिक्त शिक्षक व माध्यमनिहाय तुकड्यांवरील गंडांतर टळू शकते, असे सूत्रांनी सांगितले. परंतु शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे नवे संकट या शाळांसमोर उभे ठाकले आहे.गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास आंदोलन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सायन्सकोर, अ‍ॅकेडेमिक व अन्य उर्दू आणि हिंदी माध्यमांना संचमान्यता नाकारल्यामुळे या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या विरोधात जिल्हा परिषद सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी सीईओंना पत्र देऊन हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्थया या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.संचमान्यता ही पटसंख्येच्या आधारावर देण्यात आली आहे. मात्र, माध्यमनिहाय मान्यता देण्याचे अधिकार माझे नाहीत. त्यामुळे माध्यमनिहाय संचमान्यतेचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरील आहे. - एस.एम पानझाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प.