मुलीला फूस लावून पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:12 IST2021-02-08T04:12:12+5:302021-02-08T04:12:12+5:30

----------------- दुचाकीवरील महिलेला ट्रकने चिरडले तळेगाव दशासर : वर्धेहून अमरावतीकडे मोपेड वाहनाने येत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने मागून धक्का ...

The girl was lured away | मुलीला फूस लावून पळविले

मुलीला फूस लावून पळविले

-----------------

दुचाकीवरील महिलेला ट्रकने चिरडले

तळेगाव दशासर : वर्धेहून अमरावतीकडे मोपेड वाहनाने येत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने मागून धक्का दिल्याने मोपेडवरील महिला रस्त्यावर कोसळली. दरम्यान ट्रकखाली आल्याने उजवा पाय मांडीपासून वेगळा झाल्याची घटना तळेगाव दशासर बस स्टँडवजळ २३ जानेवारी रोजी दुपारी घडली. एकनाथ शंकरराव हरगे यांच्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

---------------

घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण

धारणी : महिला घरात झोपली असता आरोपींनी घरात घुसून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली. महिलेच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी राजकुमार बन्सीलाल बेठेकर (२३, रा. कटुंगा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------

कार्यालयातून ५७ हजारांचा मुद्देमाल लंपास

चिखलदरा : पंचायत समितीतील एमआरजीएस विभागातील संगणक, प्रींटर असा ५७५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेल्याची घटना १८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान घडली. रासप्र अधिकारी अजय अनंतराव उमप यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: The girl was lured away