शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एअरटेलकडून खोदकामाचे पावणे अकरा कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 00:23 IST

शहरात विनापरवानगी खोदकाम केल्याप्रकरणी एअरटेल मोबाईल कंपनीकडून पावणे अकरा कोटी रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले आहेत.

आठ दिवसांपूर्वीच झाले जमा : रिलायन्सचे निकष लावले, १० टक्के दंड अमरावती : शहरात विनापरवानगी खोदकाम केल्याप्रकरणी एअरटेल मोबाईल कंपनीकडून पावणे अकरा कोटी रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. एअरटेल कंपनीच्या खोदकामाचा विषय आमसभा व स्थायी समितीत गाजला होता, हे विशेष.महानगरात ४-जी इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी भुयारी केबल टाकण्याचे काम विविध मोबाईल कंपन्यांकडून काही महिन्यांपासून सुरु आहे. रिलायन्स कंपनीने शहरभर खोदकाम सुरु करण्यापूर्वी महापालिकेतून रीतसर परवानगी घेतली आणि आणि शुल्कही भरले. याच दरम्यान एअरटेल कंपनीनेदेखील परवानगी घेऊन खोदकाम केले आणि केबल टाकण्याची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र, एअरटेलने मंजुरीपेक्षा अधिक खोदकाम केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुषंगाने आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कंपनीने नेमके किती खोदकाम केले याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांना दिले होते. एअरटेलच्या खोदकामाची पाहणी केली असता सुमारे १५ ते १६ किलोमीटरचे खोदकाम केल्याचे स्पष्ट झाले. सभागृहाच्या निर्णयानुसार कारवाईअमरावती : मंजुरीपेक्षा दुप्पट खोदकाम झाल्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला. परिणामी आयुक्तांनी दंडात्मक रकमेसह एकूण खोदकामाप्रकरणी पावणे अकरा कोटी रुपये भरण्यासाठी नोटीस बजावण्याचे सांगितले होते. मात्र या दंडामधून सूट मिळावी, यासाठी एअरटेलच्या एका अधिकाऱ्याने खा. आनंदराव अडसूळ यांना साकळे घातले. हे प्रकरण निस्तरण्याची विनंती केली. त्यानंतर खा. अडसूळ यांनी एअरटेल कंपनीला सहकार्य करण्याची जबाबदारी नगरसेवक प्रशांत वानखडे यांच्यावर सोपविली होती. प्रशांत वानखडे यांनी आयुक्त गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले आदींना भेटून एअरटेल कंपनीला दिलासा देण्यासाठी धावपळ चालविल्याची माहिती आहे. मात्र, प्रशांत वानखडे यांना एअरटेल खोदकाम प्रकरणी महापालिकेतून फारशी मदत झाली नसल्याचे समजते. अखेर सभागृहाच्या निर्णयानुसार एअरटेल कंपनीकडून पावणे अकरा कोटी रुपये वसूल करण्याची कार्यवाही प्रशासनाने केली. रिलायन्स कंपनीच्या निकषानुसार १० टक्के रक्कम वाढवून पावणे अकरा कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.