शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

गणोजाला अतिवृष्टीचा तडाखा

By admin | Updated: June 29, 2015 00:37 IST

तालुक्यातील गणोजा गावाला, रविवारी दुपारी पावसाने दोन तास झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे गावाच्या शेतशिवाराचे अक्षरश: जलाशयच झाले होते.

शिवाराचे झाले जलाशय : पहिली पेरणीही दडपली, संकटांचे संकेतचांदूरबाजार : तालुक्यातील गणोजा गावाला, रविवारी दुपारी पावसाने दोन तास झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे गावाच्या शेतशिवाराचे अक्षरश: जलाशयच झाले होते. त्यामुळे १८ ते २१ जून या काळात पेरण्यात आलेल्या नालाकाठच्या शेतातील बियाण्यांसह जमीन खरडून निघाली. तालुक्यात झालेल्या या अतिवृष्टीबाबत व शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत तालुक्याचा कृषी व महसूल विभाग मात्र अजूनही अनभिज्ञच आहे.रविवारी दुपारी २ ते ४ वाजताच्या सुमारास गणोजा परिसरात अतिवृष्टी झाली. शेजारच्या सोनोरी गावालाही या अतिवृष्टीचा तडाखा बसला. त्याचप्रमाणे गणोजा गावाजवळील मोर्शी तहसीलमधील डोमक व तरोडा गावानाही या अतिवृष्टीची झळ मोठ्या प्रमाणात पोहोचली. या अतिवृष्टीमुळे जमिनीत पेरलेल्या तूर, कपाशी व सोयाबीन पिकांना मोड आल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. गावालगतच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे, काठावरील जमीन खरडून गेल्याने कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. गेल्या ५० वर्षांतही असा पूर या नाल्याला आल्याचे आम्ही पाहिलेले नाही, असे गावातील वयोवृध्द शेतकऱ्यांनी सांगितले.गणोजा हे तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील वसल्यामुळे या गावाकडे नेहमीच प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ते यावेळीही झाले असल्याची खंत गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. (शहर प्रतिनिधी)