शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीची सत्ता आहे; मात्र राज्यात महाशिवआघाडी झाल्यास जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना ही विद्यमान आघाडी सत्तेत राहू शकते. दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वात विरोधकांनी मिळून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, त्यांनाही घटक पक्षांच्या टेकू घेऊनच सत्तेची समीकरणे जुळविता येतात.

ठळक मुद्देनेतेमंडळींना साकडे : उमेदवार निवडीत लागणार कस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता राखीव झाले आहे. इच्छुक सदस्यांंनी मोर्चेबांधणीला सुरुवात करीत नेतेमंडळींना आशीर्वाद मागितले आहे. यामुळे अध्यक्षपदाचा उमेदवार निवडीसंदर्भात नेतेमंडळींचा राजकीय कस लागणार आहे.जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीची सत्ता आहे; मात्र राज्यात महाशिवआघाडी झाल्यास जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना ही विद्यमान आघाडी सत्तेत राहू शकते. दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वात विरोधकांनी मिळून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, त्यांनाही घटक पक्षांच्या टेकू घेऊनच सत्तेची समीकरणे जुळविता येतात.जिल्हा परिषदेचे पुढील अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता राखीव झाले आहे. या प्रवर्गाच्या सदस्यांची संख्या १६ आहे. यामध्ये प्रत्येकी आठ महिला व पुरुष सदस्यांचा समावेश आहे. त्यापैकी अनेक जण अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने त्यांनी आपआपल्या राजकीय गॉडफादरच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. आशीर्वाद द्या, अशी विनंती होत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक डिसेंबर-जानेवारीत होईल. तोपर्यंत इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू राहणार आहे. त्यामुळे नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे. अध्यक्षपदाचा उमेदवार निवडताना नेत्यांचाही राजकीय कस लागणार आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली असली तरी प्रत्यक्षात निवड प्रक्रियेचा कार्यक्रम अद्याप तरी घोषित झालेला नाही. आरक्षण सोडतीनंतर मात्र नव्या अध्यक्षपदासाठीचे राजकीय समीकरण मांडले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात निवड प्रक्रियेचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतरच राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.नामाप्र सदस्य, त्यांचा पक्षनागरिकांच्या मागास प्रवर्गातून जिल्हा परिषदेत निवडून गेलेल्या सदस्यांमध्ये अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, अभिजित बोके, प्रकाश साबळे, जयंत देशमुख, सुरेश निमकर, पूजा येवले, प्रियंका दगडकर, पूजा आमले, अलका देशमुख, वंदना करूले (काँग्रेस), पार्वती काठोळे, विजय काळमेघ (भाजप), राजेंद्र बहुरूपी (राष्ट्रवादी), सुनील डिके (अपक्ष), गौरी देशमुख (लढा), मयूरी कावरे (युवा स्वाभिमान) हे सदस्य आहेत. यामध्ये काँग्रेसकडे प्रत्येकी पाच पुरुष व महिला सदस्य आहेत. भाजपकडे प्रत्येकी एक पुरुष व महिला सदस्य आहे. याशिवाय दोन अपक्ष व एक युवा स्वाभिमानचा सदस्य आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद