शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
5
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
6
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
7
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
8
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
10
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
11
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
12
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
13
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
19
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
20
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
Daily Top 2Weekly Top 5

मुसाफिरांचा मुक्तसंचार! अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 10, 2014 02:27 IST

शहरात गेल्याकाही दिवसांपासून परप्रांतीय मुसाफिरांचा मुक्तसंचार वाढला आहे. भटक्या टोळ्यांच्या (मुसाफिर) नोंदी ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस ठाण्यांमधील नोंद वहीत या मुसाफिरांची नोंदच घेतली जात नसल्याचे

 पोलीस ठाण्यातील नोंदवह्या धूळ खात

प्रसन्न दुचक्के - अमरावती

शहरात गेल्याकाही दिवसांपासून परप्रांतीय मुसाफिरांचा मुक्तसंचार वाढला आहे. भटक्या टोळ्यांच्या (मुसाफिर) नोंदी ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस ठाण्यांमधील नोंद वहीत या मुसाफिरांची नोंदच घेतली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत पुढे आले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून दरोडा, चोर्‍या, घरफोड्या, चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत. गेल्या काही काळापासून शहरात मुसाफिरांचा मुक्तसंचारही वाढला आहे. कुठलीही परप्रांतीय व्यक्ती शहरात व्यवसायासाठी दाखल झाल्यास त्याला नियमानुसार संबंधित पोलीस ठाण्यातील मुसाफीर नोंद वहीत स्वत:च्या नावाची नोंद करावी लागते. या नोंदवहीत परप्रांतीयांची नोंद करण्याची जबाबदारी जेवढी मुसाफिरांची आहे तेवढीच पोलिसांचीही आहे. परंतु पोलीस ही जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. नोंदवहीत नावे नोंदविताना पोलीस मुसाफिरांकडून एक फॉर्म भरुन घेतात. फॉर्म भरताना त्यांच्याकडील आधार कार्ड, मतदार ओळखपत्र व फोटो आयडीच्या झेरॉक्स प्रतींची मागणी पोलिसांनी करणे गरजेचे असते. मुसाफिरांचा फॉर्म भरुन घेतल्यानंतर संबंधित मुसाफिराबद्दल तो मूळ रहिवासी असलेल्या पोलीस ठाण्याला माहिती देणे बंधनकारक असते. परंतु गेल्या काही वर्षांपासून शहरातील काही पोलीस ठाण्यातील मुसाफीर नोंदवह्यांमध्ये परप्रातीयांच्या नोंदी घेणे बंद झाले आहे. या नोंदवह्या पोलीस ठाण्यांमध्ये धूूळखात पडलेल्या आहेत. पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा वार्र्षिक आढावा घेताना या मुसाफीर नोंद वहीचा आढावा घेणे आवश्यक असते. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.