कोरोनामुक्त चळवळीची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:01:13+5:30

कोेरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर उपाययोजना होत आहेत. यात काही अंशी यशसुद्धा आले. मात्र, संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनामुक्त शहर चळवळीची पायाभरणी करण्यात आली. शासन, प्रशासन व हेल्पलाईनच्या माध्यमातून समाजस्तरावर कोरोनामुक्त चळवळ राबविली जाणार आहे.

The foundation of the coronation-free movement | कोरोनामुक्त चळवळीची पायाभरणी

कोरोनामुक्त चळवळीची पायाभरणी

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती : प्रशासन, हेल्पलाईनची समन्वय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोेरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर उपाययोजना होत आहेत. यात काही अंशी यशसुद्धा आले. मात्र, संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनामुक्त शहर चळवळीची पायाभरणी करण्यात आली. शासन, प्रशासन व हेल्पलाईनच्या माध्यमातून समाजस्तरावर कोरोनामुक्त चळवळ राबविली जाणार आहे.
येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियममध्ये मंगळवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत प्रभाकरराव वैद्य यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली. यात हेल्पलाईनच्या कोरोनामुक्त चळवळीला अंतिम रूप देण्यात आले. बैठकीला महापौर चेतन गावंडे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, भाजप जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर, गटनेता प्रशांत वानखडे, गटनेता बबलू शेखावत, गटनेता सुनील काळे, नगरसेवक विलास इंगोले, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव व यशवंत सोळंके, माजी महापौर मिलिंद चिमोटे आदी उपस्थित होते. दरम्यान बुधवारा, जवाहर गेट परिसरातून समिती गठित करण्याविषयी शिक्कामोर्तब झाले. महानगरात हा पहिला प्रयोग असणार आहे. संचालन संजय तीरथकर यांनी तर आभार माधुरी चेंडके यांनी मानले.

Web Title: The foundation of the coronation-free movement