बहिरम नाक्यावरून वनरक्षक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : बैतूल-परतवाडा आंतरराज्य महामार्गावरील वनविभागाच्या बहिरम नाक्यावरून वनरक्षक बेपत्ता झाले आहेत. अनेक महिन्यांपासून ते वनरक्षक ...

Forest ranger disappears from Bahiram Naka | बहिरम नाक्यावरून वनरक्षक बेपत्ता

बहिरम नाक्यावरून वनरक्षक बेपत्ता

googlenewsNext
ठळक मुद्देवनमजूर सांभाळतात नाका : लाखो रुपयांच्या इमारती दुर्लक्षित




लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : बैतूल-परतवाडा आंतरराज्य महामार्गावरील वनविभागाच्या बहिरम नाक्यावरून वनरक्षक बेपत्ता झाले आहेत. अनेक महिन्यांपासून ते वनरक्षक नाक्यावरील ड्युटीवर हजरच झालेले नाहीत. हा नाका वनरक्षकांनी दोन वनमजुरांच्या स्वाधीन केला आहे. ते वनमजूर हा नाका सांभाळत आहेत.
परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कक्षेत बहिरम नाका आहे. या नाक्यावर आठ-आठ तासांच्या पाळीनुसार तीन वनरक्षक कार्यरत असणे आवश्यक ठरते. या वनरक्षकांकरिता बहिरम नाक्याला लागून निवास व सभागृह आहे. पण, कोणी वास्तव्यास नसल्याने देखभालीअभावी इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. साहित्य लंपास केले गेले. याच मार्गावर चेकपोस्टच्या अलीकडे बांधलेल्या एका इमारतीचीही पडझड झाली आहे.
बहिरम नाका आणि बहिरम बीटकरिता नियुक्त वनरक्षकांचे मुख्यालय बहिरम आहे. ड्युटीच्या तासांत तरी त्यांनी बहिरमला थांबणे अपेक्षित असले तरी ते थांबत नाहीत.

बहिरम नाक्यावर दोन वनरक्षकांना आठ-आठ तास ड्युटी देण्यात आली आहे. ड्युटीच्या वेळेत त्यांनी नाक्यावर थांबणे अपेक्षित आहे.
- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा.

Web Title: Forest ranger disappears from Bahiram Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.