शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वनमजुराने व्याघ्र प्रकल्पाच्या वाहनाचा केला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 6:00 AM

एमएच २७ बी.झेड. ४६२७ क्रमांकाचे चार चाकी वाहन गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ३ महिन्यांपूर्वीच दाखल झाले. हे वाहन वनमजूर पृथ्वीराज पवार हे नियमबाह्य चालवीत आहे. सदर वाहन शुक्रवारी सकाळी १० वाजतादरम्यान हरिसालहून चिखलदरा येत असताना कोलकासनजीक सागवानच्या झाडाला धडकले. यात चारचाकी वाहनाच्या पुढचा भाग नादुरुस्त झाला.

ठळक मुद्देपोलिसात तक्रार नाही : वाहन गुपचूप दुरुस्तीसाठी

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गुगामल व्याघ्र प्रकल्पाचे वाहन भरधाव चालवून वनमजुराने शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास धारणी मार्गावर अपघात घडवून आणला. यामध्ये रस्त्याच्या कडेला डौलात उभे असलेल्या सागवान झाडाचे दोन तुकडे झाले. अपघातग्रस्त वाहन परतवाड्यातील एका गॅरेजमध्ये आणून दुरुस्तीसाठी लपवून ठेवले.एमएच २७ बी.झेड. ४६२७ क्रमांकाचे चार चाकी वाहन गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ३ महिन्यांपूर्वीच दाखल झाले. हे वाहन वनमजूर पृथ्वीराज पवार हे नियमबाह्य चालवीत आहे. सदर वाहन शुक्रवारी सकाळी १० वाजतादरम्यान हरिसालहून चिखलदरा येत असताना कोलकासनजीक सागवानच्या झाडाला धडकले. यात चारचाकी वाहनाच्या पुढचा भाग नादुरुस्त झाला. अपघाताची कुठेच वाच्यता न होऊ देता परतवाडा येथील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आणले होते. हा सर्व प्रकार व्याघ्रप्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी का दडविला, हे अद्याप अनुत्तरित आहे. संबंधित वनमजूर वजा व्याघ्र प्रकल्पाचा स्वयंघोषित चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसांत देण्यात आली नाही, हे विशेष. सदर वाहनदुरुस्तीचा किमान २० ते २५ हजार रुपये खर्च येणार असल्याची शक्यता आहे. सदर वाहन नवीन असल्याने पोलिसांत तक्रार दिली असती तर संबंधित विमा कंपनीकडून त्याच्या दुरुस्तीचा खर्च मिळणे अपेक्षित होते. परंतु वाहन चुपचाप गॅरेजमध्ये लावल्याने त्याचा खर्च संबंधित अधिकारी शासनाच्या तिजोरीतून करणार की स्वत:च्या पगारात, असा सवाल उपस्थित होत आहे.व्याघ्र नियमाची ऐसी-तैसीघटांग ते धारणीपर्यंत संपूर्ण परिसर व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारित येतो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा राबता असल्याने वाहनांची तासी वेग मर्यादा २० किलोमीटर ठेवण्यात आली आहे. ठिकठिकाणी गतिरोधक आणि वन्यप्राण्यांना जाण्यासाठी मार्ग म्हणून पदचिन्ह काढण्यात आले आहेत. असे असताना शुक्रवारी गुगामल वन्यजीव विभागाचे वाहन भरधाव वेगाने नियम धाब्यावर ठेवून चालविण्यात आले अपघातात रस्त्याच्या कडेवरील सागवान झाडाची दोन तुकडे झाल्याने वाहनाचा वेग अधिक असल्याचे स्पष्ट होते. व्याघ्र प्रकल्पाचे वाहनच नियम तोडत असल्याने इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.वाहनाला किरकोळ अपघात झाला. संबंधित चालक वजा वनमजूर मद्यधुंद अवस्थेत होता किंवा नाही याची चौकशी करण्यात येणार आहे. अपघाताची चौकशी करण्यात येईल.- विशाल माळी,प्रभारी उपवनसंरक्षक,गुगामल वन्यजीव विभाग

टॅग्स :forest departmentवनविभाग