शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

चार आरामशीनवर वन विभागाची कारवाई

By admin | Updated: May 12, 2014 23:05 IST

अमरावती वन विभागाच्या फिरत्या पथकाने चार आरामशीनवर धाडसत्र राबवून अवैध १७0 घनमीटर लाकूड जप्त केले. त्यामुळे अवैध लाकूड कटाई जोरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमरावती : अमरावती वन विभागाच्या फिरत्या पथकाने चार आरामशीनवर धाडसत्र राबवून अवैध १७0 घनमीटर लाकूड जप्त केले. त्यामुळे अवैध लाकूड कटाई जोरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कारवाई

करण्यात आलेल्या आरामशीनमध्ये वरूड परिक्षेत्रातील शेंदूरजना घाटच्या मलकापूर येथील विश्‍वकर्मा सॉ मिल, वरूड येथील चेतना सॉ मिल, परतवाडा वन परिक्षेत्रातील चांदूरबाजार येथील किसान सॉ मिल, अचलपूर येथील आझाद सॉ मिलचा समावेश आहे. तसेच वणी (बेलखेड) येथे भीमराव बागडे यांच्या राहत्या घरी फर्निचरचे काम सुरू असताना २१ घनमीटर सागवानचे लाकूड जप्त करण्यात आले. हे सागवान नवीन तोडीचे असल्याचा कयास वन विभागाने लावला आहे. या लाकडाची किंमत ७ हजार ९९ रुपये आहे. भारतीय वन अधिनियम १९२७, २६ (फ), ४१, ४२ व ५२ अन्वये बागडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू आहे.

अमरावतीच्या

उपवनसंरक्षक निनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक एस. डी. सोनोने यांच्या पथकाने आरामशीनवर धाडसत्र सुरू केले आहे, हे विशेष. आरामशीन तपासणीदरम्यान बहुतांश सॉ मिलवर क्षमतेपेक्षा जास्त लाकूडसाठा असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले आहे. लाकडाचा परवाना नसताना हे लाकूड आरामशीनमध्ये कसे आणले जातात, हा सवाल वन विभागाच्या फिरत्या पथकापुढे उपस्थित होत आहे.

आरामशीनमध्ये

अवैधरीत्या आढळलेले १७0 घनमीटर लाकूड जप्त करून सॉ मिल मालकाविरूद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ कलम ४७ नियमांतर्गत १९४२ कलम ८६, ६६ अन्वये आर्थिक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वन

विभागाच्या फिरत्या पथकाने पहिल्या टप्प्यात परतवाडा व वरूड वनपरिक्षेत्र टार्गेट केले आहे. त्यानुसार आरामशीनवर धाडसत्र राबवून लाकडाचा असलेल्या साठय़ाची तपासणी केली जात आहे. आडजात लाकडाची कटाई करणार्‍या आरामशीनवरच सर्वाधिक गैरप्रकार होत असल्याचे फिरत्या पथकाच्या निदर्शनास आले आहे. पुढील टप्प्यात अमरावती, बडनेरा, धामणगाव येथील आरामशीनची तपासणी होणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक निनू सोमराज यांनी दिली. (प्रतिनिधी)