शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा कोटींचा ‘मलिदा’ कुणाच्या खिशात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2017 00:07 IST

महापालिका क्षेत्रातील ‘जिओमॅपिंग’चे काम पाच वर्षांपासून अपुर्णावस्थेत असताना कंत्राटदार एजंसी असलेल्या ...

एडीटीपीमधील सावळागोंधळ : सायबरटेकला ९० टक्के पेमेंटअमरावती : महापालिका क्षेत्रातील ‘जिओमॅपिंग’चे काम पाच वर्षांपासून अपुर्णावस्थेत असताना कंत्राटदार एजंसी असलेल्या ‘सायबरटेक’ला तब्बल ९० टक्के रक्कम ‘पेड’ करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे या सव्वा कोटींच्या आर्थिक अनियमिततेमध्ये कुणाच्या खिशात किती मलिदा गेला? याची चौकशी महापालिकेच्या वतीने आरंभली गेली आहे. संबंधित विभागप्रमुखांनी ‘तोंडावर बोट’ ठेवल्याने या प्रकरणातील संशय अधिकच बळावला आहे.हे सव्वा कोटींचे दान कुणाच्या स्वाक्षरीने, कुणाच्या दबावाने आणि कुणाच्या माध्यमातून सायबरटेकला देण्यात आले, त्यात महापालिकेच्या कोणत्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आर्थिक बिदागी लाटली, हे चौकशीनंतर उघड होईल. मात्र तत्पूर्वी महापालिकेचा एडीटीपी विभाग संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. दरम्यान या कोट्यवधीच्या आर्थिक अयिमिततेची जबाबदारी स्वीकारण्यास संबंधित विभागाने टाळाटाळ चालविली असून हा घोटाळा आमसभेत रंगण्याचेही संकेत आहेत.सन २०११ -१२ या आर्थिक वर्षात नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला सुमारे दीड कोटी रुपये मिळालेत. या निधीतून महापालिका क्षेत्रात ‘जिओग्राफिकल इन्फरमेशन सिस्टिम’ कार्यान्वित करुन जिओमॅपिंग करायचे होते. यात रस्ते, उद्यान, मालमत्ता, भुयारी गटार योजना यासारख्या ५६ लेअरचा समावेश होता. अमरावती शहरातील संपूर्ण भौगोलिक परिस्थिती एका क्लिकवर आणून ती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पाहता यावी, असा तो एकंदरित प्रकल्प होता. अर्थात शहरातील ‘इच अ‍ॅन्ड एव्हरी कंम्पोनंट’ चे ‘जिओमॅपिंग’ यात अपेक्षित होते. तत्कालिन आयुक्त नवीन सोना यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी ठाण्याच्या सायबरटेक या कंपनीला सुमारे १.५ कोटी रुपयांमध्ये हे काम देण्यात आले. मात्र आज पाच वर्ष उलटूनही जिओमॅपिंगचे काम पूर्णत्वास जावू शकले नाहीत. ५६ लेअरपैकी एकाही लेअरचे काम पुर्णत्वास गेले नसताना मात्र सायबरटेकला एकूण देयकांपैकी तब्बल ९० टक्के रक्कम देण्यात आली. एडीटीपीमधील दीपक खडेकर यांच्यानुसार तत्कालिन आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कार्यकाळात ७० टक्के तर चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यकाळात २० टक्के प्रदान करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात सायबरटेकने केलेले एक टक्काही काम दिसत नसल्याने त्यांना तब्बल ९० टक्के पेमेंट कशाच्या आधारावर करण्यात आले?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.घोंगडे फेकण्याचा प्रयत्न दीड कोटी रुपयांपैकी तब्बल १.३५ कोटी रुपये सायबरटेकला अदा करण्यात आल्याचे उघड झाले असताना एडीटीपीविभागाने अंगावरील घोंगडे झटकण्याचा प्रयत्न चालविला आहे. कर विभागाशी संबंधित जनरल असेसमेंटचे काम सायबरटेकला देण्यात आले असून ते काम पूर्ण झाल्यानंतरच २०११-१२ नंतर केलेल्या जिओमॅपिंगचे काम प्रत्यक्षात दिसू शकेल,असा दावा एडीटीपीमधील दीपक खडेकर यांनी केला आहे. तथापि ५६ लेअरपैकी असेसमेंट हे केवळ एक लेअर असल्याने उर्वरित ५५ लेअर अर्थात घटकांचे काम प्रत्यक्षात कसे दिसू शकेल, याचे उत्तर मात्र त्यांना देता आले नाही. एकंदरितच एडीटीपीमधील अधिकाऱ्यांनी सायबरटेकला देण्यात आलेल्या ९० टक्के देयकाबाबत कानावर हात ठेवल्याने हा आर्थिक घोटाळा दडपविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही बोलले जात आहे.४ मार्चच्या बैठकीत या मुद्यावर सांगोपांग चर्चा झाली. यासंदर्भात एडीटीपीकडून संपूर्ण माहिती मागविली आहे. मंगळवारी सायबरटेक आणि जिओमॅपिंगबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना फाईल घेऊन येण्याचे निर्देश दिले आहेत.- हेमंतकुमार पवार, आयुक्त, महापालिका