शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात इच्छुक उमेदवारांची घरासाठी शोधमोहीम

By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी अनेकांनी चालविली आहे. मात्र या मतदारसंघावर चौफेर लक्ष ठेवता यावे, याकरिता इच्छुक

विदर्भ मिल परिसराला प्राधान्य : अचलपूर मतदारसंघात स्थानिक, बाहेरील वाद जोरातअमरावती : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी अनेकांनी चालविली आहे. मात्र या मतदारसंघावर चौफेर लक्ष ठेवता यावे, याकरिता इच्छुक उमेदवारांनी परतवाडा येथे घर भाड्याने घेण्यासाठी जोरात शोधमोहीम चालविली आहे. विशेषत: विदर्भ मिल परिसराला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.अचलपूर व चांदूरबाजार तालुक्याचा समावेश असलेला अचलपूर मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र कालांतराने राजकीय समीकरण बदलले. मागील दहा वर्षांपासून हा मतदारसंघ अपक्ष उमेदवारांच्या ताब्यात आहे. हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस रणनीती आखते. परंतु अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने काँग्रेसला अपयश येत असल्याचे वास्तव आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, बसप, रिपाइं व मनसेने उमेदवार उतरविण्याची तयारी चालविली आहे. यात पक्षाच्या नेत्यांनी मतदारसंघात भेटीगाठी, बैठकी, कार्यक्रमांना उपस्थिती, मेळावे आयोजनाचा धडाका सुरु केला आहे. २५ आॅगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होण्याचे संकेत आहेत. त्यानुसार मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी परतवाडा हे मुख्यालय बनविण्याची तयारी केली आहे. परतवाड्यात मोक्याच्या जागी घर भाड्याने मिळावे, याकरिता इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांना घर शोधण्यासाठी कामाला लावले असल्याचे दिसून येते. अमरावती मार्गालगतच्या विदर्भ मिल परिसरात भाड्याने घर मिळाल्यास ते त्वरित बुकिंग करण्याचा सल्लादेखील नेत्यांचा आहे. अचलपूर मतदारसंघावर बाहेरील उमेदवारांचा डोळा असल्याने या इच्छुक उमेदवारांनीसुध्दा परतवाडा येथे घर भाड्याने घेण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे भविष्यात पक्षाकडे तिकीट मागण्यापासून ते प्रचार करण्यापर्यंत स्थानिक व बाहेरील उमेदवार हा वाद कायम चर्चिला जाणार आहे. काही जणांनी समाजाची व्होट बँक लक्षात घेता निवडणुकीत उतरण्याची तयारी चालविली आहे. विदर्भ मिलच्या चौधरीनगर परिसरात इच्छुक उमेदवारांनी घर भाड्याने शोधण्याची शोधमोहीम सुरु केली आहे. दुसरीकडे विदर्भ मिल परिसरात घर भाड्याचे दर वाढविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)