शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर

By admin | Updated: July 28, 2014 23:15 IST

जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत होता. पेरणी योग्य पाऊस बरसत असल्याने शेतकरी सुखावला होता. डोळ्यांमध्ये हिरवे स्वप्न रंगविणारा बळीराजा खुुशीत होता. रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत गावात शांतता होती.

गावकऱ्यांनीच वाचविले गावसचिन सुंदरकर, सुमित हरकुट/ब्राम्हणवाडा थडीजिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत होता. पेरणी योग्य पाऊस बरसत असल्याने शेतकरी सुखावला होता. डोळ्यांमध्ये हिरवे स्वप्न रंगविणारा बळीराजा खुुशीत होता. रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत गावात शांतता होती. काही वेळात येणाऱ्या प्रलयामुळे क्षणात होत्याचे नव्हते होईल, अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. पाहता-पाहता पूर्णेने आक्राळ विक्राळ रूप धारण केले. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच ब्राम्हणवाडा थडी जलमय झाले. ५०० घरे पत्त्यांच्या घरांप्रमाणे कोसळून पडली. शेकडोंचे संसार उद्धवस्त झाले. पावसाचा हा विध्वंसक धुमाकूळ सुरू असताना गावकऱ्यांनीच पुराच्या वेढ्यात सापडलेल्या शेकडो गावकऱ्यांचे प्राण वाचविले.ब्राह्मणवाडा थडी आणि घाटलाडकीत रविवारी घडलेल्या प्रलयाच्या खाणाखुणा आजही कायम आहेत. क्षणात विनाश घडविणाऱ्या जलप्रलयासाठी जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित करून आता चर्चा झडतीलही. प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे ही भयंकर स्थिती उदभवली असे गावकरी उड बडवून सांगताहेत. पावसाने घातलेल्या धिंगाण्यामुळे त्यांच्या डोळ्यातील पाणीही आटले आहे.‘लोकमत’प्रतिनिधीने पूरग्रस्त ब्राह्मणवाड्यात भेट देऊन आढावा घेतला असता तेथील दृष्य अत्यंत विदारक होते. काही प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी प्रलयंकारी परिस्थितीबाबत दिलेली माहिती अंगावर शहारे आणणारी होती. पावसाने गिळले पुर्णेने हिरावलेचार दिवसांपूर्वीच्या अतिवृष्टीमुळे उदरनिर्वाहाचे साधन असलेले अवघे तीन एकर शेत खरडून निघाले. जिवन-मरणाचा सवाल डोळ्यांसमोर उभा ठाकला. यातून कसेबसे सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच रविवारी पूर्णा कोपली आणि जगण्याचा आधार असलेला मुलगाही हिरावला गेला. पावसाच्या पाण्याने पीक गेले तर पूर्णेच्या विध्वंसाने पूत्र गमवावा लागला. ही कहाणी आहे ब्राह्मणवाडा थडी येथील गणेश वांगे यांची. तरणाताठा मुकबधिर मुलगा नदीच्या पूरात वाहून गेल्याने वांगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गणेश वांगे हे पत्नी दोन मुले, एका मुलीसह ब्राह्मणवाडा थडी येथे राहतात. तीन एकर शेतीच्या भरवशावरच त्यांच्या कुटुंबाची गुजराण होती. यंदा या तीन एकरात त्यांनी कपाशीचे बियाणे पेरले होते. त्यांचा स्वप्नील नामक १८ वर्षीय मुलगा कुरळ येथील पूर्णामाय मुकबधिर पुनर्वसन केंद्रात शिकत होता. शनिवारीच तो गावात आला. त्याची आई मेस चालविते. वडिलांची प्रकृती बरी नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डबे पोहोचविण्याचा हट्ट धरला आणि तो डबे घेऊन निघाला. त्यावेळी त्याची आई छाया, बहिण कीर्ती आणि भाऊ अक्षय हे तिघेही घरीच होते.