शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश विभागाच्या करारनाम्यात घबाड

By admin | Updated: June 21, 2014 01:17 IST

शहरातील पथदिवे देखभाल, दुरूस्तीचा कंत्राट महापालिकेच्या प्रकाश विभागाने मे. ब्राईट ईलेक्ट्रॉनिक कंपनीकडे सोपविला;..

अमरावती : शहरातील पथदिवे देखभाल, दुरूस्तीचा कंत्राट महापालिकेच्या प्रकाश विभागाने मे. ब्राईट ईलेक्ट्रॉनिक कंपनीकडे सोपविला; मात्र हा कंत्राट अटी, शर्तीनुसार सुरू झाला नसून यामध्ये बरेच घबाड असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.मागील १५ वर्षांपासून पथदिवे देखभाल, दुरुस्तीचा कंत्राट एकाच कंत्राटदाराकडे ठेवण्यामागे अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. मार्च-२०१४ मध्ये या कंत्राटाला मुदतवाढ देताना नैसर्गिक १० टक्के रक्कम वाढविण्याचा निर्णय प्रकाश विभागाने एकतर्फी घेतला. यावेळी स्थायी समिती किंवा आमसभेला अवगत करण्यात आले नाही, अशी माहिती आहे. कंत्राटदारासोबत झालेला करारनामा हा इंग्रजी भाषेत करण्यामागे बरेच काही दडल्याचेही बोलले जात आहे. लोकप्रतिनिधी या करारनाम्याची प्रत मागत असताना वर्षभराचा कालावधी लोटूनही ती अद्याप प्रकाश विभागाने दिली नाही. त्यामुळे या कंत्राटात अधिकाऱ्यांची भागिदारी असल्याचा आरोपही होत आहे. लोकप्रतिनिधींना या कंत्राटाबाबत गोपनीयता बाळगण्याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. करारनाम्यातील अटीनुसार कंत्राटदारांनी १८ वाहने या कामी ठेवून बंद पथदिवे शोधून काढणे अनिवार्य आहे. मात्र लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांनी तक्रार दिल्याशिवाय बंद पथदिवे सुरू होत नाही, असा अनुभव या कंत्राटदारांचा आहे. वर्षानुवर्षे पथदिवे देखभाल, दुरुस्तीचा कंत्राट याच कंत्राटदारांकडे असल्याने हा कंत्राटदार आपल्या मर्जीनुसारच कामकाज चालवीत आहे. अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने अनेक दिवस पथदिवे बंद असतानासुद्धा कंत्राटदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरदिवसाला १८ वाहने कार्यरत असणे आवश्यक आहे. मात्र यापैकी अनेक वाहने बंद असतानाही एक रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या कंत्राटदारावर अधिकाऱ्यांची विशेष मेहेरनजर असल्याचे दिसून येते. पथदिवे बंद असो की सुरु? कंत्राटदाराला महिन्याकाठी १७ ते १८ लाख रुपये देयकापोटी अदा करावेच लागते. पथदिवे तपासणारी यंत्रणा कुचकामी ठरल्याने कंत्राटदार आणि अधिकारी ठरवेल तेच खरे मानल्याशिवाय प्रशासनापुढे पर्याय नाही, असा अपंग कारभार प्रकाश विभागाचा सुरु आहे.(क्रमश:)