शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिला आक्रमक

By admin | Updated: June 22, 2014 23:47 IST

सर्रास सुरू असलेल्या दारूविक्रीचे दुष्परिणाम भोगणाऱ्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन रविवारी मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

रास्ता रोको : ठाणेदारांच्या आश्वासनानंतर तणाव निवळलाकिरण होले - थिलोरीसर्रास सुरू असलेल्या दारूविक्रीचे दुष्परिणाम भोगणाऱ्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन रविवारी मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन महिलांची समजूत काढली व दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिला शांत झाल्या. दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील वातावरण बिघडत चालले आहे. घराघरांमध्ये कौटुंबिक कलह वाढला असून गावातील ताणतणावही वाढत आहेत. गावातील तरूण व्यसनाधीन होत चालल्याने अवैध दारूविक्रीवर अंकुश लावण्याची मागणी गावातील महिलांनी दारूविक्रीवर अंकुश लावण्याच्या मागणीसाठी दर्यापूर पोलीस ठाण्यात निवेदनही दिले होते. परंतु पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे गावातील अवैध दारूविक्रेत्यांचे मनोेबल वाढतच गेले. आणखी काही लोकांनी नव्याने दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. गेल्या दोन महिन्यांत दारूच्या आहारी गेलेल्या दोन पुरूषांनी आत्महत्या केल्याने दोन कुटुंब उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे गावातील १०० ते २०० संतप्त महिलांनी मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात पुरूषांचाही सहभाग होता. वाहने अडविल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दर्र्यापूर पोलिसांना या आंदोलनाची माहिती मिळताच ठाणेदार पवार यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. परंतु महिला काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. दोन महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनावर पोलिसांनी काहीही कारवाई का केली नाही? असा सवाल यावेळी महिलांनी ठाणेदारांना केला. ठाणेदार पवार यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले व अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले. त्यानंतर महिलांनी हे आंदोलन मागे घेतले. आंदोलनात संगीता चोरपगार, राजकन्या वाकपांजर, सुनीता वाकपांजर, रेणुका वाकपांजर, सुनंदा वाकपांजर व गावातील शेकडो महिला-पुरूष सहभागी झाले होते.