शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी एकत्र येणे काळाची गरज

By admin | Updated: March 4, 2017 00:17 IST

जिल्हा परिषद् अमरावती पशु संवर्धन विभाग व पंचायत समिती मोर्शीतर्फे भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळावा सालबर्डी येथे घेण्यात आला.

वृषाली विघे : सालबर्डी येथे पशुप्रदर्शनी, शेतकरी मेळावामोर्शी : जिल्हा परिषद् अमरावती पशु संवर्धन विभाग व पंचायत समिती मोर्शीतर्फे भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळावा सालबर्डी येथे घेण्यात आला. अध्यक्षीय भाषणातून महिला बालकल्याण सभापती वृषाली विघे यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नसून शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाला हमीभाव मिळविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.प्रदर्शनीचे उद्घाटन सतीश उईके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वृषाली विघे, प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे, खंडारे, प्रकाश चव्हाण, पद्मा पांचाळे, रेखा सोनटक्के, वाकपांजर, नरेंद्र जिचकार उपसरपंच, प्रकाश विघे, संचालक बाजार समिती, नितीन काकडे, रुपेश वाळके, राजेंद्र पोहकार, संजय काळसकर, बापूराव गायकवाड, माया ठाकरे, प्रशांत राऊत, दिलीप मानकर, काटोले, देशमुख, सोळंके, साधना घुगे, नवरे, बोबडे, भालेराव, ईश्वर इंगळे आदी उपस्थित होते.दुग्ध व्यवसायापासून होणाऱ्या विक्रमी उत्पादनातून शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेणखताच्या माध्यमातून शेंद्रय शेती करुन उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्यामुळे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वृषाली विघे यांनी अध्यक्षीय भाषणातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके , आभाळे, नरेंद्र जिचकार, प्रकाश विघे, दिलीप मानकर आदी मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या भव्य पशु प्रदर्शनीला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्तिथी असून पशु पालकांतर्फे आपल्या पशुची नोंदणी करण्यात आली त्यावेळी विविध जातीचे शेकडो पशु या प्रदर्शनीमध्ये पाहण्यास मिळाले असून उत्कृष्ट पशु पलकांना मान्यवरांच्या हस्ते २ लक्ष्य ८० हजार रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पी. व्ही. सोलंके यांनी केले. संचालन राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र हूड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय भेलाऊ, सुधाकर भिवगडे, आजनकर, सारडे, वरघट यांच्यासह आदींनी अथक परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)