शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा वीज कार्यालयात ठिय्या

By admin | Updated: September 30, 2014 23:28 IST

विद्युत वितरण कंपनीला अनेकदा निवेदने देऊनही शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा नियमीत खंडित होत आहे. यामुळे बिलनपुरा भागातील हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिके धोक्यात आली आहेत.

अधिकारी बेपत्ता : शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापअचलपूर : विद्युत वितरण कंपनीला अनेकदा निवेदने देऊनही शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा नियमीत खंडित होत आहे. यामुळे बिलनपुरा भागातील हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिके धोक्यात आली आहेत. यासाठी मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मात्र चार तासांपर्यंत एकही अधिकारी इकडे फिरकलाच नसल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.शेतकरी कार्यालयात; अधिकारी बेपत्ताअचलपूर येथील बिलनपुरा भागातील शेतजमिनीकरिता सस्पेंन्स भागात विद्युत डी.पी. बसविण्यात आली आहे. शहरी भागातून ग्रामीण भागात या शेतकऱ्यांच्या शेतातील मोटरपंपाची विद्युत जोडणी करण्यात आली तेव्हा त्यांना प्रत्येकी एक दिवसाआड विद्युत पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात सतत वर्षभरापासून त्रास दिल्या जात आहे. तोंडगाव परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा नियमित करुन बिलपुरा परिसरातील जवळपास सातशे शेतकऱ्यांच्या हजार हेक्टर शेताकरिता असलेले मोटर पंप बंद पडून आहेत. परिणामी केळी, संत्रा, कापूस, तूर सह भाजीपाला पिके करपू लागली असल्याचे निवेदन आज मंगळवारी दुपारी ४ .३० वाजता दिले.सततच्या खंडित विद्युत पुरवठ्यामुळे त्रासलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याला परिस्थिती पाहण्यासाठी कार्यालय गाठले. परंतु सतत चार तास या कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित झाला नाही. अखेर कोकाटे नामक एका शाखा अभियंत्याला बोलावून निवेदन देण्यात आले. विद्युतबिल भरल्यानंतरही सततचा विद्युत पुरवठा खंडीत राहत असल्याने यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या व काही विपरीत घडल्यास त्याला विद्युत वितरण कंपनी जबाबदार राहाणार असल्याचे निवेदन पवन बुंदेले, मनीष लाडोळे, विनोद पोटे, गोकुल ककरानीया, हर्ष चौधरी, दिनेश पोटे, राजु केदार, सुधीर कपले, गणपत पोळे, काशिराम निचत या शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.