‘त्या’ महिलेसाठी पाणावले परिचारिकेचे डोळे

By Admin | Updated: December 18, 2014 00:06 IST2014-12-18T00:06:08+5:302014-12-18T00:06:08+5:30

विकृत मानवी प्रवृत्तीच्या कचाट्यात सापडलेल्या ‘त्या’ जखमी महिलेला आरोग्य सेवा पुरविणाऱ्या परिचारिकेचे डोळे पाणावले असून ...

'The' eyes of the nurses who fall for the woman | ‘त्या’ महिलेसाठी पाणावले परिचारिकेचे डोळे

‘त्या’ महिलेसाठी पाणावले परिचारिकेचे डोळे

अमरावती : विकृत मानवी प्रवृत्तीच्या कचाट्यात सापडलेल्या ‘त्या’ जखमी महिलेला आरोग्य सेवा पुरविणाऱ्या परिचारिकेचे डोळे पाणावले असून राज्य महिला गृहात पाठविलेली ‘ती’ महिला सुध्दा मातेची माया देणाऱ्या परिचारिकेच्या आठवणीने भावनावश झाली आहे.
इर्विन रूग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ९ मध्ये मानवी विकृतीच्या अत्याचाराने पीडित महिलेचे संगोपन अलका सिरसाट या परिचारिकेने केले. त्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरीता ‘लोकमत’ने वृत्तांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यावर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता इर्विनमध्ये जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांमार्फत अकोला येथील राज्य महिलागृहात पाठविण्यात आले होते. मात्र, महिलागृहात गेल्यावरही ती महिला सतत अलका सिरसाट या परिचारिकेची आठवण करीत ‘मेरी माई कहां है’ असे भावनात्मक उदगार काढीत आहे.
तर दुसरीकडे परिचारिका अलका शिरसाट यांच्या भावना जाणून घेतल्या असता त्यांचेही डोळे पाणावले होते. पहिल्यांदाच मानवी संवेदनाचे उदाहरण इर्विनच्या रुग्णसेवेत पाहायला मिळाले आहे.
‘त्या’ महिलेला राज्य महिला गृहात पाठविण्यात आले आहे. तिला आरोग्य सेवा देणारी परिचारिकासुध्दा भावनावश झाली आहे. त्या महिलेची आठवण करीत आहे. तसेच ती महिला सुध्दा परिचारिकेची आठवण करीत आहे.
-मंदा गाढवे, अधिसेविका, जिल्हा सामान्य रुग्णालय.

Web Title: 'The' eyes of the nurses who fall for the woman