वरूडमध्ये बेभाव दारूविक्रीला उधाण! होम डिलिव्हरी कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:12 IST2021-05-27T04:12:56+5:302021-05-27T04:12:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वरूड : होम डिलिव्हरीला एमआरपीची मर्यादा घालून मद्यविक्रीची परवानगी प्रशासनाने दिली आहे. तथापि, या अटी कागदावरच ...

Expensive liquor sales in Warud! Home delivery on paper only! | वरूडमध्ये बेभाव दारूविक्रीला उधाण! होम डिलिव्हरी कागदावरच!

वरूडमध्ये बेभाव दारूविक्रीला उधाण! होम डिलिव्हरी कागदावरच!

लोकमत न्यूज नेटवर्क

वरूड : होम डिलिव्हरीला एमआरपीची मर्यादा घालून मद्यविक्रीची परवानगी प्रशासनाने दिली आहे. तथापि, या अटी कागदावरच ठेवून तालुक्यात बेभाव दारूविक्री सुरू आहे.

दारूविक्रेते १५० ते १८० कमाल विक्री मूल्य असलेली दारू २०० ते २५० रुपयांत सर्रास बारच्या पुढ्यातच विक्री करत असल्याचे वरूड शहर व तालुक्यातील चित्र आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांना यामुळे शेकडो रुपयांचा फटका बसत असल्याने दरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी तळीरामांकडून होत आहे.

--------------

कोरोनामुळे मद्यविक्री बारमध्ये करता येत नसून, होम डिलिव्हरीची परवानगी आहे. मात्र, एमआरपी जेवढी असेल, तेवढीच रक्कम घेणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम घेतली जात असेल, तर चौकशी करू.

- कुंदन कुमरे, एक्साईज अधिकारी

Web Title: Expensive liquor sales in Warud! Home delivery on paper only!