शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित गटांसाठी उमेदवारांची चाचपणी

By admin | Updated: October 13, 2016 00:26 IST

जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे.

पेचप्रसंग : राजकीय पक्षांकडे उमेदवारांची वानवाअमरावती : जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. त्याअनुषंगाने झेडपीच्या सर्कल आरक्षणाचे वेध राजकीय पुढाऱ्यांना लागले होते. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांचे आरक्षण ५ आॅक्टोबरला जाहीर झाल्यानंतर आता २३ राखीव गटांसाठी सक्षम उमेदवारांची राजकीय पक्षात वानवा आहे. त्यामुळे उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. आरक्षणाची सोडत काढण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या जिल्हा परिषदेतील दिग्गजांना नव्या आरक्षणाने आणखी हादरा दिला आहे. जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या या नेत्यांवर त्यांचे हक्काचे गट आरक्षित झाल्याने राजकीय दृष्ट्या घरी बसण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे ५९ पैकी २३ गट अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे या गटामध्ये योग्य व सक्षम उमेदवारांचीे चाचपणी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. बहुतांश आरक्षित जिल्हा परिषदेच्या गटात राजकीय पक्षांना उमेदवार मिळत नसल्याने दुसऱ्या ठिकाणचे इच्छूक पुढारी मात्र आरक्षित गटात निवडणूक लढण्यासाठी गटात व राजकीय पक्षाचे जिल्हास्तरावरील नेत्यांकडेही तिकीटा करिता लॉबीग करीत आहे. मात्र आरक्षित गटाचे तिकीटाकरिता स्थानिक पातळीवरील उमेदवारांना प्राधान्य देण्याकडे बहूतांश राजकीय पक्षांचा कल दिसून येत आहे. जर हा पर्याय मिळालाच नाही तर मात्र दुसरीकडील इच्छुकांचा विचार होऊ शकतो. त्यादुष्टीने काही पुढाऱ्यांनी जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ गटापैकी अनु.जाती ११ गट राखीव झाले. यामध्ये ६ गट महिलांसाठी आरक्षित आहेत तर ५ गट पुरूषांसाठी राखीव झाले आहेत. अनु. जमातीकरिता १२ गट राखीव ठेवण्यात आले आहेत. यात प्रत्येकी ६ महिला व पुरूषांकरिता आहेत. नामाप्र.साठी १६ जागा राखीव आहेत. यात प्रत्येकी ८ गट महिला आणि पुरूषांकरीता राखीव आहेत. याशिवाय सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण २० जागा असून यापैकी १० जागा आहे. यामध्ये राखीव गटातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छूक उमेदवारांची गर्दी कमी आहे. यातूनही निवडून येणारा व जनसंपर्क असलेल्यांना तिकिट देण्याची तयारी राजकीय पक्षाची आहे. मात्र काही ठिकाणी उमेदवार मिळत नसल्याने त्या गटाकरीता उमेदवारांची चाचपणी केली जात आहेत. (प्रतिनिधी)