शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वाहनांना भरावा लागणार पर्यावरण कर

By admin | Updated: December 18, 2015 00:41 IST

'जुनं ते सोनं' असे मानत जुनी वाहने वापरणे आणि आठवण म्हणून घरात ठेवणाऱ्यांना आता पर्यावरण कर भरावा लागणार आहे.

जितेंद्र दखने अमरावती'जुनं ते सोनं' असे मानत जुनी वाहने वापरणे आणि आठवण म्हणून घरात ठेवणाऱ्यांना आता पर्यावरण कर भरावा लागणार आहे. १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर पर्यावरण कर आकारण्याची प्रक्रिया आरटीओकडून सुरू होणार आहे. वाहन जितके जुने तितकेच ते दर्जेदार आणि रुबाबदार मानले जाते. त्याला जिल्ह्यात अपवाद नाही. जुन्या मोटर सायकलसह चारचाकी वाहनांचा वापर करणाऱ्यांची संख्याही जिल्ह्यात मोठी आहे. वाहन चालविण्यास योग्य नाही. जुने झाले आहे. त्याचे स्पेअर पाटर््स मिळत नाही. भंगारात किंमतही मिळणार नाही. त्यापेक्षा आठवण म्हणून दारात असू दे, अशा आग्रहापोटी हजारो वाहने आज घरात, दारात पडून आहेत. अशी वाहने भंगार करण्यापूर्वी त्याची रीतसर कागदपत्राची पूर्तता आरटीओ कार्यालयाकडून करावी लागते. त्यासाठी पर्यावरण कर भरणेही बंधनकारक असते. आतापर्यंत कर वसुलीबाबत कठोर धोरण अवलंबले जात नव्हते. दरम्यान देशातील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन केंद्र सरकार १० वर्षांहून अधिक जुनी व्यावसायिक वाहने भंगारात काढण्याचे धोरण अवलंबण्याचा विचार शासन करीत आहे. पर्यावरणाचा विषय गांभीर्याने घेतला जात आहे. याच धर्तीवर १५ वर्षे व त्याहून अधिक जुन्या वाहनांकडून पर्यावरण कर वसुलीची मोहीम तीव्र केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यतील १५ वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या मोटर सायकली व चारचाकी अशा वाहनांची यादी काढली जाणार आहे. त्यानुसार वाहन धारकांना पर्यावरण कर भरण्याबाबतच्या नोटीस आरटीओंकडून बतावली जाणार आहे. जुना व्यावसायिक वाहनांचा पर्यावरण कर पासिंगच्या निमित्ताने भरण्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र खासगी मोटर सायकल आणि चारचाकी वाहनांबाबत हा कर भरण्याबाबत उदासीनता आहे. अशी वाहने रस्त्यावर चालविण्यासाठी घरात आठवण म्हणून ठेवण्यासाठी अथवा भंगारात काढण्यासाठी पर्यावरण कर भरण्याशिवाय वाहन धारकांसमोर दुसरा पर्याय उरणार नाही. १५ वर्षे अथवा त्यापेक्षा जुन्या मोटर सायकलीसाठी दोन हजार रुपये तर चारचाकी वाहनांसाठी तीन हजार ५०० रुपये अशाप्रकारे पर्यावरण कराची तरतूद प्रादेशिक परिवहन विभागाने केली आहे. हा कर पांच वर्षांसाठी आकरला जातो. त्यानंतर पुन्हा हा कर भरणे बंधनकारक आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या वाहनांपैकी ज्यांनी कर भरला नाही त्यांना कर भरण्यासाठी मोहीम राबविली जात आहे.