शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक वॉर्ड प्रणालीने होणार

By admin | Updated: September 22, 2015 00:16 IST

येत्या २०१७ मध्ये फ्रेबुवारी महिन्यात होऊ घातलेल्या अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही एक सदस्यीय (वॉर्ड) प्रणालीने घेण्यावर ...

शिक्कामोर्तब : कल्याण- डोंबिवलीची निवडणूक एक सदस्यीय पद्धतीनेअमरावती : येत्या २०१७ मध्ये फ्रेबुवारी महिन्यात होऊ घातलेल्या अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही एक सदस्यीय (वॉर्ड) प्रणालीने घेण्यावर राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. पुढील आॅक्टोबर महिन्यात कल्याण- डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही वॉर्ड प्रणालीनेच होत आहे, हे विशेष.स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका या वॉर्ड अथवा प्रभाग प्रणाली, याबाबत शासनकर्त्यांमध्ये मतभिन्नता होती. परंतु कॅबिनेट मंत्रीमंडळाने यापूर्वी घेतलेल्या बैठकीत महापालिका निवडणुका वॉर्ड प्रणालीनेच घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. कायदादेखील तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकांनी मतदार यादीची जुळवाजुळव चालविली आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात २०१४ मध्ये राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या बैठकीत एक सदस्यीय प्रणालीनेच निवडणुका घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त, निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. परंतु मध्यंतरी जिल्हा परिषद, नगरपरिषदांचे निकाल हे राज्यातील सत्ताधारी भाजप, सेनेच्या विरोधात गेल्याने एक सदस्यीय प्रणाली ऐवजी बहुसदस्यीय प्रणालीने निवडणुका घेण्याबाबत शासन विचारधीन होते. त्याअनुषंगाने चर्चादेखील करण्यात आली. मात्र एक सदस्यीय प्रणालीने कॅबिनेटच्या बैठकीत झालेला निर्णय बदलविणे अशक्य नसल्याने शासनकर्त्यांनाही दोन पाऊल मागे सरकावे लागले. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात कल्याण- डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही एक सदस्यीय प्रणालीनेच होत आहे. त्यामुळे राज्यभरात होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका या एक सदस्यीय प्रणालीनेच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. हल्ली अमरावती महापालिकेत ४३ प्रभागात ८७ सदस्य संख्या असून येत्या काळात ही सदस्य संख्या वाढण्याचे संकेत आहे. मतदार संख्येच्या आधारावर वार्ड संख्येचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. काही महिन्यांपासून प्रभाग की वॉर्ड प्रणालीने निवडणूक, याविषयी निर्माण झालेली गोंधळाची स्थिती आता दूर झाली आहे. (प्रतिनिधी)वार्ड प्रणालीनेच निवडणूक घेण्याबाबतची तयारी काही महिन्यांपासून सुरु झाली आहे. हीच तरतूद करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने २०१४ मध्ये दिल्या आहेत. कल्याण- डोंबिवली महापालिकेची निवडणूक एक सदस्यीय प्रणालीने होत आहे.- मदन तांबकेरनिवडणूक अधिकारी, महापालिका.