शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
3
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
4
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
5
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
6
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
7
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
8
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
9
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
10
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
11
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
12
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
13
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
14
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
15
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
16
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
17
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
18
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
19
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
20
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘अजुबा’कडे आढळला आठ किलो गांजा गुन्हे शाखेची मोठी कारवाई; वडाळीजवळ आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 19:36 IST

या प्रकरणी एका २४ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रविवार २५ जानेवारी रोजी नागपूर-अमरावती एक्सप्रेस हायवेवरील वडाळी सर्व्हिस रोडजवळ ही कारवाई करण्यात आली. योगेश ऊर्फ अजुबा धनराज रायकवार (वय २४, रा. रतनगंज, अमरावती) असे अटक आरोपीचे नाव आहे.

अमरावती: शहरात अमली पदार्थांच्या विक्रीविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, शहर गुन्हे शाखेने एका धडक कारवाईत ८ किलो १०५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका २४ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रविवार २५ जानेवारी रोजी नागपूर-अमरावती एक्सप्रेस हायवेवरील वडाळी सर्व्हिस रोडजवळ ही कारवाई करण्यात आली. योगेश ऊर्फ अजुबा धनराज रायकवार (वय २४, रा. रतनगंज, अमरावती) असे अटक आरोपीचे नाव आहे.

एफआयआरनुसार, गुन्हे शाखेचे पथक आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, नागपूर-अमरावती एक्सप्रेस हायवेवरील वडाळी सर्व्हिस रोडजवळ एक तरुण मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून योगेश ऊर्फ अजुबा रायकवार याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून १,६२,१०० रुपये किमतीचा ८ किलो १०५ ग्रॅम गांजा, १० हजारांचा मोबाईल असा एकुण १ लाख ७२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व सीमा दाताळकर यांच्या पथकाने केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati: Eight Kilos of Ganja Seized, One Arrested Near Wadali

Web Summary : Amravati police seized 8 kg of ganja near Wadali, arresting a 24-year-old. The operation, conducted on Nagpur-Amravati highway, led to the confiscation of ₹1,72,100 worth of drugs and a mobile phone. The accused, Yogesh alias Ajuba Raikwar, faces charges under the NDPS Act.