बिबट्याची शिकार हुकली; कुत्रा जखमी, पगमार्क आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 06:00 AM2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:43+5:30

विद्यापीठ परिसरात दोन वर्षांपासून बिबट्याचे जोडपे वावरत असल्याचे अनेक पुरावे निदर्शनास आले आहेत. वनविभागाने बिबट्यावर त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले. तथापि, आतापर्यंत बिबट्याने मनुष्यावर हल्ला अथवा जखम केलेली नाही. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करता येत नाही, असे वनाधिकाऱ्यांचे टिपिकल उत्तर आहे.

The dog was injured, footmark found | बिबट्याची शिकार हुकली; कुत्रा जखमी, पगमार्क आढळले

बिबट्याची शिकार हुकली; कुत्रा जखमी, पगमार्क आढळले

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठात मुलींच्या वसतिगृहानजीक बिबट जोडप्यांचे वास्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रसायनशास्त्र विभाग परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्याने एका कुत्र्याचा माग घेतला. शिकार हुकली; मात्र हल्ल्यात कुत्रा जखमी झाला आहे. मंगळवारी मुलींच्या वसतिगृहानजीक बिबट्याचे पगमार्क आढळले. या घटनांनी सुरक्षा यंत्रणेची भंबेरी उडाली आहे.
विद्यापीठ परिसरात दोन वर्षांपासून बिबट्याचे जोडपे वावरत असल्याचे अनेक पुरावे निदर्शनास आले आहेत. वनविभागाने बिबट्यावर त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले. तथापि, आतापर्यंत बिबट्याने मनुष्यावर हल्ला अथवा जखम केलेली नाही. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करता येत नाही, असे वनाधिकाऱ्यांचे टिपिकल उत्तर आहे. मात्र, एखाद्या वेळी पुढ्यात आलेल्या माणसावर बिबट्या हल्ला करू शकतो, अशी भीती सदोदित व्यक्त होत आहे.
विद्यापीठात रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास रसायनशास्त्र विभाग परिसरात दोन सुरक्षा रक्षक गस्तीवर होते. त्यांच्या मागे काही अंतरावर एक कुत्रेदेखील चालत होते. बिबट्याने अचानक या कुत्र्यावर झडप घातली. कुत्र्याचा आवाज होताच सुरक्षा रक्षकांनी मागील बाजूस टॉर्चने प्रकाश टाकला. त्यामुळे उजेड पडताच बिबट्या शिकारीचा मनसुबा सोडून पळून गेला. जखमी कुत्र्यावर पशुवैद्यकामार्फत उपचार सुरू आहे. कुत्र्याच्या पाठीवर पंंजाचे निशाण, तर येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मनात बिबट्याची भीती कायम आहे.

विद्यापीठात बिबट्या जोडपे दोन बछड्यांसह आहे. मंगळवारी रात्री बिबट आल्याचे पुरावे मिळाले आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या आहे. जखमी कुत्र्यावर उपचार केला जात आहे.
- रवींद्र सयाम, सहायक कुलसचिव, सामान्य प्रशासन

Web Title: The dog was injured, footmark found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.