शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईला मातृप्रेमाचा विसर का? ‘मदर्स डे’ला निरुत्साह

By admin | Updated: May 10, 2014 23:54 IST

विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून होणारा विरोध झुगारूनही ‘फ्रेंडशिप डे’ आणि ‘व्हॅलेंटाईन्स डे’ प्रचंड उत्साहाने साजरे करणार्‍या तरूणाईला ‘मदर्स डे’चा मात्र विसर पडतो.

‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला मात्र जल्लोष

वर्षा वैजापूरकर - अमरावती

विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून होणारा विरोध झुगारूनही ‘फ्रेंडशिप डे’ आणि ‘व्हॅलेंटाईन्स डे’ प्रचंड उत्साहाने साजरे करणार्‍या तरूणाईला ‘मदर्स डे’चा मात्र विसर पडतो. आईच्या प्रेमाची महती केवळ सोशल मीडियापूरतीच मर्र्यादित झाली आहे, असे खेदाने म्हणावे लागते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मातृदिन रविवारी निरूत्साहातच साजरा होणार आहे. ‘आई म्हणजे एक नाव असतं...घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं..’ आईचे महात्म्य सांगणार्‍या एक ना अनेक रचना आहेत. आईचे प्रेम म्हणजे ईश्वराचे अस्तित्व.ईश्वराला प्रत्येक घरात जाऊन वास करणे शक्य नव्हते, म्हणून त्याने ‘आई’ निर्माण केली. पुत्र कूपुत्र असू शकतो; पण माता कधीच कूमाता नसते. अफाट, अगाध, अनंत वात्सल्याचा, प्रेमाचा आणि अवर्णनीय त्यागाचा ठेवा हृदयात जपणार्‍या ‘आई’बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. परदेशात ‘मदर्स डे’, आणि भारतात ‘मातृदिना’च्या निमित्ताने आईचे आभार व्यक्त केले जातात. परंतु नि:स्वार्थ सेवा म्हणजे आई. प्रेमाच्या, त्यागाच्या आणि सेवेच्या मोबदल्यात कधीच, कशाचीही अपेक्षा करीत नाही. परंतु मुलांना मात्र आईच्या या त्यागाची आणि प्रेमाची क्वचितच जाणीव असते. कित्येकदा आईला गृहितच धरले जाते. त्यामुळेच ‘मातृदिन’विशेषत्वाने साजरा करण्यावर भर दिला जात नाही. अनेकांना तर ‘मातृदिना’ची आठवणही राहत नाही. म्हणून तर ‘व्हॅलेंटाईन्स डे’ साजरा करण्यासाठी विरोध पत्करणार्‍या; प्रसंगी जीवाचा आटापिटा करणार्‍या तरूणाईला ‘मातृदिना’चे विस्मरण होताना दिसते. काही पक्ष व संघटनांकडून ‘व्हॅलेन्टाईन्स डे व फ्रेंडशिप डे’ला कडाडून विरोध होतो. हा दिवस साजरा न करण्याची गळ घातली जाते. प्रसंगी आक्रमक पवित्राही घेतला जातो; परंतु तरीही हा दिवस उत्साहात साजरा करण्याचा अट्टाहास होतो. विरोध झुगारून शहरातील हॉटेल्स, पर्यटनस्थळे, रेस्टॉरेंट्समध्ये व्हॅलेंटाईन्स डे निमित्त भेटवस्तूंचे आदानप्रदान होते.